Vaibhav Sooryavanshi : ‘वयाच्या या टप्प्यावर असं क्वचितच पाहायला मिळतं,’ राशिद खान वैभव सुर्यवंशीवर काय म्हणाला?

Vaibhav Sooryavanshi : राशिदने वैभवच्या फलंदाजीचं विश्लेषण केलं आहे. 

20
Vaibhav Sooryavanshi : ‘वयाच्या या टप्प्यावर असं क्वचितच पाहायला मिळतं,’ राशिद खान वैभव सुर्यवंशीवर काय म्हणाला?
  • ऋजुता लुकतुके

Vaibhav Sooryavanshi                 वय अवघं १५ वर्षं, पण फलंदाजीतील आत्मविश्वास आणि आक्रमकता पाहून क्रिकेटविश्वातील दिग्गजही प्रभावित झाले आहेत. भारतीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या खेळाचं अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानने भरभरून कौतुक केलं आहे. वैभवची निर्भीड फलंदाजी, फटक्यांची निवड, खेळाची समज आणि हात-नजरेचा समन्वय या गोष्टी त्याला इतर युवा खेळाडूंपेक्षा वेगळं ठरवतात, असं राशिदने म्हटलं. (Vaibhav Sooryavanshi)

“तो निर्भीड क्रिकेट खेळतो. त्याला स्वतःचे फटके माहीत आहेत आणि प्रत्येक गोलंदाजाविरुद्ध कसा खेळायचा, याची त्याला चांगली कल्पना असते. एवढ्या कमी वयात खेळाची अशी समज क्वचितच पाहायला मिळते. ही गोष्ट साधारणपणे अनुभवातून येते; पण वैभवकडे ती आतापासूनच आहे,” असं राशिदने सांगितलं. अफगाणिस्तानचा संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. आणि त्या दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्याने आपलं सुर्यवंशीबद्दलचं मत मांडलं. (Vaibhav Sooryavanshi)

(हेही वाचा – Prostitution Racket Noida : हॉटेलमध्ये सुरू होता देहविक्रीचा अड्डा; ४ महिलांची पोलिसांकडून सुटका, मालक फरार)

वैभवच्या फलंदाजीतील नैसर्गिक ताकदीनेही राशिद प्रभावित झाला आहे. त्याचा हात-नजरेचा समन्वय आणि मोठे षटकार मारण्याची क्षमतावेगळी असल्याचं त्याने नमूद केलं. राशिदने वैभवला ‘देवाने दिलेली प्रतिभा’ असलेला खेळाडू म्हटलं असून, त्याच्यातील ही गुणवत्ता वयाच्या तुलनेत असामान्य असल्याचं स्पष्ट केलं. (Vaibhav Sooryavanshi)

राशिदला त्याच्या स्वतःच्या बालपणीच्या क्रिकेटचीही आठवण झाली. मात्र, एवढ्या कमी वयात वैभव ज्या पद्धतीने मोठे षटकार मारतो आणि मोठ्या व्यासपीठावर कामगिरी करतो, तसं आपण त्या वयात करू शकलो नसतो, अशी कबुली राशिदने दिली. आयपीएलसोबतच भारतीय संघातही वैभवने स्वतःची क्षमता दाखवली आहे, त्यामुळे तो अत्यंत विशेष खेळाडू असल्याचं राशिदने म्हटलं. (Vaibhav Sooryavanshi)

(हेही वाचा – Abhishek Sharma 30 Ball Century : ३० चेंडूंत टी-२० शतक अन् त्यानंतर मैदानातच योगमुद्रा; अभिषेक शर्माचं सेलिब्रेशन व्हायरल)

वैभवच्या उदयामागे गेल्या काही महिन्यांत केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा मोठा वाटा आहे. २०२६च्या १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध ८० चेंडूंत १७५ धावांची तुफानी खेळी केली. त्यानंतर आयपीएलमध्येही त्याने निर्भीड फलंदाजी करत आपली छाप पाडली आणि आता भारतीय संघात पदार्पण करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पाऊल ठेवलं आहे. (Vaibhav Sooryavanshi)

वैभवच्या या प्रवासाकडे आता केवळ भारतीय क्रिकेटच नव्हे, तर जगभरातील क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलं आहे. अनुभवी राशिद खानसारख्या गोलंदाजाकडून मिळालेली ही पावती त्याच्या नैसर्गिक आक्रमक शैलीची आणि कमी वयात विकसित झालेल्या खेळाच्या समजेचीच दखल म्हणावी लागेल. (Vaibhav Sooryavanshi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.