Nepal Floods नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी महापुरानंतर लहान मुलांवरील संकट अधिकच गडद झाले आहे. राष्ट्रीय बाल हक्क परिषदेच्या तातडीने केलेल्या पाहणी अहवालानुसार, या महापुरात १०२ मुलांचे आई-वडील दोघेही बेपत्ता आहेत. यामध्ये ४९ मुली आणि ५३ मुलांचा समावेश आहे. अहवालानुसार, रसुवा, नुवाकोट आणि धादिंग या जिल्ह्यांमध्येच किमान १७ हजार मुलांना संरक्षणाची आवश्यकता आहे. महापुरामुळे मोठ्या संख्येने मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. कुटुंबापासून दुरावलेल्या आणि पालकांच्या छत्रछायेला मुकलेल्या मुलांसमोरील धोके वाढले आहेत. (Nepal Floods)
अभ्यासामनुसार, ४३९ मुले आपल्या आई-वडिलांपासून दुरावली आहेत, ज्यामध्ये २२२ मुली आणि २१७ मुले आहेत. तर ६९२ बाधित मुले आपल्या आई-वडिलांसोबत किंवा इतर पालकांसोबत आहेत. यामध्ये ३६१ मुली आणि ३३१ मुलांचा समावेश आहे. बाधित मुलांमध्ये २१ दिव्यांग मुलेदेखील आहेत. महापुरामुळे प्रभावित झालेल्या ३२ शाळांपैकी १९ शाळा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. या शाळांमध्ये सुमारे ९,४०० विद्यार्थी शिकत होते, ज्यांपैकी ३,९२८ विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. अहवालानुसार ४८८ विद्यार्थी अजूनही बेपत्ता आहेत, तर पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. (Nepal Floods)
(हेही वाचा – MSRTC : NCMC कार्डधारकांसाठी आता BHIM App द्वारे सहज करता येणार Top-up)
राष्ट्रीय बाल हक्क परिषदेने हे केवळ तात्काळ मदतीचे प्रकरण नसून बाल हक्क, संरक्षण, शिक्षण, आरोग्य, पोषण, कौटुंबिक काळजी, सामाजिक सुरक्षा आणि दीर्घकालीन विकासाशी जोडलेले बहुआयामी मानवी संकट असल्याचे म्हटले आहे. या अहवालात बाधित मुलांची ओळख पटवणे, त्यांच्या कुटुंबाचा शोध घेऊन पुनर्भेट घडवून आणणे, सुरक्षित तात्पुरता निवारा, शिक्षण सुरू ठेवणे, आरोग्य-पोषण आणि मनोसामाजिक मदतीला तत्काळ प्राधान्य देण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. (Nepal Floods)
परिषदेच्या पथकाने १ ते ५ सप्टेंबर दरम्यान रसुवा, नुवाकोट, धादिंग, गोरखा, तनहूँ आणि चितवन या प्रभावित भागांचा, तात्पुरत्या निवारा केंद्रांचा आणि होल्डिंग सेंटर्सचा अभ्यास केला. ५ सप्टेंबरपर्यंत पूरग्रस्त जिल्ह्यांतील होल्डिंग सेंटर्समध्ये १,२३३ मुले होती, ज्यामध्ये ६३२ मुली आणि ६०१ मुले होती. बाधित मुलांच्या पुनर्वसनासाठी स्थानिक पातळीवर बाल हक्क समित्यांच्या माध्यमातून प्रक्रिया पुढे नेली जात आहे. आई-वडील बेपत्ता असल्यास आधी कुटुंबातील इतर सदस्यांकडे किंवा नातेवाईकांकडे मुलांना ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. तसे शक्य न झाल्यास कायदेशीर प्रक्रियेद्वारे कुटुंब-आधारित काळजी किंवा बालगृहाची व्यवस्था केली जाईल. (Nepal Floods)
(हेही वाचा – Crime : मुंबईत पोलीस चौकीतूनच वायरलेस वॉकी-टॉकी चोरीला; व्ही. पी. रोड पोलिसांकडून तपास सुरू)
ललितपूर येथील गोदावरी येथे बाधित मुलांसाठी तात्पुरते संरक्षण केंद्रही तयार करण्यात आले आहे. येथे सुमारे ५० मुलांना ठेवण्याची क्षमता असून उपचार, मनोसामाजिक समुपदेशन आणि शिक्षणाची व्यवस्था केली जात आहे. दरम्यान, काठमांडूतील डल्लू येथील गीतामाता माध्यमिक विद्यालयात भोटेकोशी महापुरामुळे बाधित झालेल्या ७० मुलांचे शिक्षण पुन्हा सुरू करण्यात आले आहे. या मुलांना अभ्यासासोबतच मनोसामाजिक समुपदेशन, आरोग्य तपासणी आणि खेळांच्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. (Nepal Floods)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

