Panna मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील मझगवां येथील NMDC (राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ) च्या हिरा खनन प्रकल्पात बुधवारी २७.२९ कॅरेटचा अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा (जेम क्वालिटी) नैसर्गिक हिरा सापडला आहे. या हिऱ्याची किंमत सुमारे दोन कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. (Panna)
मार्च २०२४ मध्ये खाणीतील काम पुन्हा सुरू झाल्यानंतर या प्रकल्पात सापडलेला हा सर्वात मोठा ‘जेम क्वालिटी’ हिरा आहे. यापूर्वी जुलै महिन्यात याच प्रकल्पात १३.१६ कॅरेटचा हिरा सापडला होता, ज्याचा विक्रम आता मोडला गेला आहे. त्याआधी या कालावधीत १०.०४ कॅरेटचा हिरा सापडला होता. आता २७.२९ कॅरेटच्या हिऱ्याने हे दोन्ही विक्रम मागे टाकले आहेत. (Panna)
(हेही वाचा – Manoj Jarange Patil यांना मुंबईत आंदोलनाला परवानगी नाकारण्यासाठी याचिका; कोणी केला विरोध?)
हिरा व्यवसायातील तज्ज्ञांच्या मते, २७.२९ कॅरेटच्या या हिऱ्याची बाजारपेठेतील किंमत सुमारे दोन कोटी रुपये असू शकते. मात्र, याची खरी किंमत लिलावादरम्यान निश्चित होईल. हिऱ्याची गुणवत्ता, कटिंग-पॉलिशिंगची शक्यता आणि त्यावेळेस बाजारातील मागणी यावर ही किंमत अवलंबून असेल. (Panna)
मझगवां प्रकल्पात हिरेयुक्त किंबरलाइट धातूवर (ore) यंत्रांच्या साहाय्याने प्रक्रिया केली जाते. NMDC च्या माहितीनुसार, २७.२९ कॅरेटचा हा हिरा मिळणे हे खाण प्रकल्पात वापरण्यात येणारे तंत्रज्ञान आणि कामगारांच्या मेहनतीचे फळ आहे. (Panna)
(हेही वाचा – बांग्लादेशच्या T20 World Cup मधून माघारीसाठी आसिफ नझरुल जबाबदार; चौकशी समितीचा निष्कर्ष)
मझगवां येथील NMDC चा हा प्रकल्प आशियातील एकमेव ‘यांत्रिक हिरा खाण’ (Mechanized Diamond Mine) मानला जातो. येथे नैसर्गिक हिऱ्यांचे यांत्रिक पद्धतीने उत्पादन केले जाते. या प्रकल्पात संघटित हिरा उत्पादन १९६७ मध्ये सुरू झाले होते, तर व्यापक स्तरावर पद्धतशीर उत्पादन १९७१-७२ पासून सुरू झाले. (Panna)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

