India ODI Squad 2026 : वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; रोहित-विराटचे पुनरागमन, पंतला मात्र डच्चू

India ODI Squad 2026 : संघाचा उपकर्णधार के. एल. राहुल आहे. 

9
India ODI Squad 2026 : वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; रोहित-विराटचे पुनरागमन, पंतला मात्र डच्चू
  • ऋजुता लुकतुके

India ODI Squad 2026             वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला संघात स्थान मिळालेले नाही. शुभमन गिलकडे कर्णधारपद कायम ठेवण्यात आले असून के. एल. राहुल उपकर्णधार असेल. (India ODI Squad 2026)

भारतीय संघात एकूण १५ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, के. एल. राहुल, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, गुरनूर ब्रार, आकिब नबी आणि नमन धीर यांचा संघात समावेश आहे. आकिब नबी आणि नमन धीर यांना प्रथमच एकदिवसीय संघात संधी मिळाली आहे. (India ODI Squad 2026)

(हेही वाचा – Maharashtra Cabinet Orders : ३० दिवसांत बदलणार वस्त्यांचे रूप; १ जानेवारी २०११ पूर्वीच्या घरांना मिळणार हक्काचा मालकी पट्टा)

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या पुनरागमनामुळे संघाला या दोघांच्या अनुभवाचे बळ मिळणार आहे. दोघेही यापूर्वीच्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचा भाग होते. त्या मालिकेसाठी जाहीर झालेल्या संघातही शुभमन गिल कर्णधार, तर रोहित आणि विराटचा समावेश होता. (India ODI Squad 2026)

मात्र, ऋषभ पंतचा संघात समावेश न झाल्याने यष्टीरक्षकाच्या भूमिकेबाबत लक्ष वेधले गेले आहे. पंतने भारताकडून अखेरचा एकदिवसीय सामना २०२५च्या चॅम्पियन्स करंडकात खेळला होता. आता त्याच्या जागी ध्रुव जुरेलला संधी देण्यात आली आहे. के. एल. राहुलही यष्टीरक्षक म्हणून संघात आहे. (India ODI Squad 2026)

(हेही वाचा – Davis Cup 2026 : भारताला मोठा धक्का; युकी भांबरी कोरियाविरुद्धच्या डेव्हिस चषक सामन्यातून बाहेर)

रवींद्र जडेजाचेही एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे. फिरकी विभागात त्याच्यासोबत कुलदीप यादवही असेल. वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांच्यावर असेल. नितीश कुमार रेड्डी आणि आकिब नबी यांच्यामुळे संघात अष्टपैलू पर्यायही उपलब्ध झाले आहेत. (India ODI Squad 2026)

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन वनडे सामने २७, २९ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी होणार आहेत. पहिला सामना थीरुवनंतपुरममध्ये, तर पुढील सामने गुवाहाटी आणि जयपूरमध्ये होणार आहेत. या मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. (India ODI Squad 2026)

(हेही वाचा – Maharashtra Water Crisis : उन्हाळ्यातील पाणीसंकट टाळण्यासाठी राज्य सरकारचे ‘मिशन टंचाई कृती आराखडा’)

वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघ : 

शुभमन गिल (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, ध्रुव जुरेल, नितिश कुमार रेड्डी, अकीब नबी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, गुरनूर ब्रार आणि नमन धीर. (India ODI Squad 2026)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.