Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात वीर सावरकर विचारांचा जागर, ‘जेन झी’च्या संकल्पनेतून साकारला जीवनपट

14
Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात वीर सावरकर विचारांचा जागर, 'जेन झी'च्या संकल्पनेतून साकारला जीवनपट
Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात वीर सावरकर विचारांचा जागर, 'जेन झी'च्या संकल्पनेतून साकारला जीवनपट

Ganeshotsav 2026: “गणेशोत्सव हे केवळ धार्मिक कार्य नसून ते हिंदू संघटना, राष्ट्रीय एकता आणि सामाजिक समरसता वाढवण्याचे एक उत्तम माध्यम आहे”, वीर सावरकर यांच्या या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या उद्देशाने वाशी येथील संतोष कानडे यांच्या घरी वीर सावरकर यांचा जीवनपट उलगडणारा देखावा साकारला आहे. संतोष कानडे यांचा पुतण्या  आणि आजचा जेन झी १८ वर्षीय दर्श कानडे याने या देखाव्याची सजावट केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची शिकवण देणारा हा वैशिष्ट्यपूर्ण देखावा साकारण्याची संकल्पनाही त्याचीच आहे. गणेशोत्सवात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचे आणि जीवनप्रवासाचे प्रदर्शन करणारा हा देखावा अत्यंत प्रेरणादायी आणि राष्ट्रभक्तीपर आहे.

देखाव्याचे वेगळेपण…
परदेशी कपड्यांची पहिली होळी, मार्सेलिस समुद्रात वीर सावरकर यांनी घेतलेली जगप्रसिद्ध उडी, कारागृहात अमानवी छळांना तोंड देताना आपल्या प्रतिभेच्या बळावर कारागृहाच्या भिंतींवर कोरलेले महाकाव्य, रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत असताना केलेली सामाजिक क्रांती या काही प्रमुख घटना या देखाव्यात दाखविण्यात आल्या आहेत.

हेही वाचा  – Hanuman Ansh box office collection : ‘हनुमान अंश’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम; 40व्या दिवशीही मजबूत कमाई, 290 कोटींचा टप्पा पार

वीर सावरकर यांच्या विचारांचा प्रसार…
या आगळ्यावेगळ्या देखाव्याविषयी संतोष कानडे म्हणाले की, “अशा राष्ट्रभक्तिपर देखाव्यांच्या माध्यमातून वीर सावरकरांच्या विचारांचा प्रसार व्हावा अशी भावना आहे. “पत्रकारितेच्या आणि आपल्या लेखनाच्या माध्यमातून संतोष कानडे यांनी गेल्या ६ वर्षांपासून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारसरणीचा, त्यांच्या राष्ट्रभक्तीचा आणि सामाजिक सुधारणांच्या विचारांचा प्रसार करण्यात योगदान देत आहेत. ते गेल्या ६ वर्षांपासून ‘सावरकर विचार मंच’ या संस्थेचे कार्य करत आहेत. विज्ञाननिष्ठ हिंदुत्व, जातिभेद निर्मूलनाचे कार्य, भाषाशुद्धीची चळवळ आणि प्रखर राष्ट्रवाद तरुणांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने असे देखावे विविध ठिकाणी साकारण्यात यावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.