Harsh Singh : राष्ट्रकूल स्पर्धेतील सुवर्णानंतर ज्युदोपटू हर्षची नजर आशियाई क्रीडास्पर्धेवर

Harsh Singh : राष्ट्रकूल स्पर्धेतील सुवर्णानंतर ज्युदोपटू हर्षची नजर आशियाई क्रीडास्पर्धेवर

83
Harsh Singh : राष्ट्रकूल स्पर्धेतील सुवर्णानंतर ज्युदोपटू हर्षची नजर आशियाई क्रीडास्पर्धेवर
Harsh Singh : राष्ट्रकूल स्पर्धेतील सुवर्णानंतर ज्युदोपटू हर्षची नजर आशियाई क्रीडास्पर्धेवर
  • ऋजुता लुकतुके

ग्लासगो येथे झालेल्या २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणारा भारतीय ज्युदोपटू हर्ष सिंग(Harsh Singh)आता आशियाई स्पर्धेच्या तयारीला लागला असून, जपान आणि जॉर्जियात विशेष प्रशिक्षण घेण्याचा त्याचा मानस आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतभारताला पहिलं वहिलं ज्युदो सुवर्ण पदक त्याने मिळवून दिलं. त्यनंतर हर्षने आता आपले लक्ष्य आशियाई स्पर्धा आणि आगामी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धांवर केंद्रित केले आहे.(Harsh Singh)

२३ वर्षीय हर्षने ग्लासगो येथे पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात ऑस्ट्रेलियाच्या ऑलिम्पियन जोशुआ कॅट्झचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. या विजयामुळे भारतीय ज्युदोला मोठी चालना मिळाली आहे. स्पर्धेनंतर बोलताना हर्ष म्हणाला की, राष्ट्रकुल स्पर्धेतील यश महत्त्वाचे असले, तरी आशियाई स्पर्धा अधिक कठीण आणि स्पर्धात्मक असणार आहे. त्यामुळे जागतिक दर्जाच्या खेळाडूंविरुद्ध सराव करणे आवश्यक असल्याचे त्याने स्पष्ट केले.(Harsh Singh)

हर्षच्या मते, जपान हा ज्युदोचा उगमस्थान मानला जातो आणि तेथील प्रशिक्षण पद्धती जगातील सर्वोत्तम मानल्या जातात. तर जॉर्जियातील प्रशिक्षण शिबिरे तांत्रिक कौशल्य, ताकद, फिटनेस आणि उच्च दर्जाच्या स्पर्धात्मक सरावासाठी प्रसिद्ध आहेत. या दोन्ही देशांतील खेळाडूंसोबत सराव केल्यास स्वतःच्या खेळात महत्त्वपूर्ण सुधारणा करता येईल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.(Harsh Singh)

(हेही वाचा – India vs SL, Test Series : साई सुदर्शन सराव सामन्याला मुकणार, पहिल्या कसोटीआधी लंकेत पोहोचण्याचा विश्वास )

हर्षने सांगितले की, गेल्या काही वर्षांत भारतीय ज्युदोमध्ये सकारात्मक बदल झाले आहेत. खेळाडूंना चांगल्या सुविधा, आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव आणि वैज्ञानिक प्रशिक्षण मिळत आहे. मात्र आशियाई स्तरावर जपान, दक्षिण कोरिया, मंगोलिया आणि जॉर्जिया यांसारख्या देशांच्या खेळाडूंशी स्पर्धा करण्यासाठी अधिक तयारीची गरज आहे.(Harsh Singh)

तो सध्या आपले प्रशिक्षक आणि भारतीय ज्युदो फेडरेशनसोबत परदेशी प्रशिक्षण शिबिरांचा आराखडा तयार करत आहे. आर्थिक सहाय्य, प्रशिक्षणाचा कालावधी आणि स्पर्धात्मक कार्यक्रम याबाबत चर्चा सुरू आहे. हर्षच्या मते, राष्ट्रकुल सुवर्णपदकामुळे आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे, परंतु पुढील स्तर गाठण्यासाठी आणखी कठोर मेहनत घ्यावी लागेल.(Harsh Singh)

त्याने पुढे सांगितले की, आशियाई स्पर्धेत पदक जिंकणे हेच सध्या माझे सर्वात मोठे ध्येय आहे. त्यानंतर ऑलिम्पिक पात्रता स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करून भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो प्रयत्नशील राहणार आहे.(Harsh Singh)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.