National Flag : मुंबईत लवकरच झळकणार १५० फूट उंच तिरंगा?

68
National Flag : मुंबईत लवकरच झळकणार १५० फूट उंच तिरंगा?
National Flag : मुंबईत लवकरच झळकणार १५० फूट उंच तिरंगा?

देशभक्तीची भावना अधिक बळकट करण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी मुंबईत (Mumbai) एक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. जोगेश्वरी (पूर्व) येथील ऐतिहासिक इस्माईल युसूफ महाविद्यालय (Ismail Yusuf College) परिसरात १५० फूट उंच भव्य राष्ट्रध्वज (National Flag) उभारण्याची मागणी करण्यात आली असून, या प्रस्तावामुळे शासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.

या उपक्रमामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाची प्रेरणा असल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थी, तरुणाई आणि नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ व्हावी, तसेच महाविद्यालय परिसराला राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक म्हणून नवी ओळख मिळावी, हा या प्रस्तावामागील मुख्य उद्देश असल्याचे समजते.

महाविद्यालयाचा परिसर उंच ठिकाणी असल्यामुळे येथे १५० फूट उंच राष्ट्रध्वज (National Flag) उभारल्यास तो सुमारे एक किलोमीटर अंतरावरूनही सहज दिसू शकेल. त्यामुळे हा ध्वज परिसरातील एक महत्त्वपूर्ण आकर्षण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

(हेही वाचा – Jharkhand Student Hunger Strike : सोनम वांगचुक यांच्या आवाहनानंतर विद्यार्थी नेत्याचे उपोषण मागे)

या प्रस्तावासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत (PWD) आवश्यक आराखडा तयार करण्यात यावा, तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाने आवश्यक ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आणि प्रशासकीय मंजुरी तातडीने द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय संबंधित विभागांनी या प्रकल्पाची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

निधीबाबतही स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध झाला नाही, तर हा प्रकल्प स्वतःच्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून पूर्ण करण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक कारणांमुळे हा उपक्रम रखडू नये, यावर भर देण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना पत्र लिहून जोगेश्वरी (पूर्व) येथील शासकीय इस्माईल युसूफ महाविद्यालय परिसरात १५० फूट उंच भव्य राष्ट्रध्वज उभारण्यास मंजुरी देण्याची अधिकृत मागणी केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.