काँग्रेसच्या ‘गुंगी गुडिया’ टीकेवर Sunetra Pawar यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “वेळ आल्यावर….”

काँग्रेसच्या 'गुंगी गुडिया' टीकेवर Sunetra Pawar यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, "वेळ आल्यावर…."

109
दिल्ली भेटीत Sunetra Pawar कोणता मुद्दा मांडणार? राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठा निर्णय
दिल्ली भेटीत Sunetra Pawar कोणता मुद्दा मांडणार? राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठा निर्णय

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा काँग्रेसने केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या उल्लेखावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच गदारोळ माजला आहे. काँग्रेसच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळातून तीव्र पडसाद उमटत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. या सर्व राजकीय वादावर आता स्वतः सुनेत्रा पवार यांनी आपली पहिली आणि अत्यंत मोजक्या शब्दांतील प्रतिक्रिया देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.(Sunetra Pawar Gungi Gudiya Controversy)

(हेही वाचा : Sheikh Hasina पहिल्यांदा बांगलादेशीयांना उद्देशून भाषण देणार; बांगलादेशचे पंतप्रधान काय म्हणाले?)

सुनेत्रा पवारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली?

काँग्रेसने केलेल्या टीकेबाबत माध्यमांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विचारले असता, त्यांनी केवळ पाच शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी अवघ्या एका वाक्यात विषय संपवला आहे.  “मी वेळ आल्यानंतर उत्तर देईन…” एवढेच सांगत त्या निघून गेल्या. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळं राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. आता त्या भविष्यात नेमकं काय बोलणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.(Sunetra Pawar Gungi Gudiya Controversy)

(हेही वाचा : ‘गुंगी गुडिया’ वरून नवा राजकीय वाद’; Chhagan Bhujbal यांनी काँग्रेसला सुनावले खडेबोल)

अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण – मुख्यमंत्री

या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. “काँग्रेसचे लोक चर्चेत राहण्यासाठी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. “लोकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने चर्चेत राहण्यासाठी ‘बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ’ अशी काँग्रेसची मानसिकता झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तरावर जाणारे राजकारण पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे,” असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.(Sunetra Pawar Gungi Gudiya Controversy)

 

 

 

 

 

 

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.