Ram Mandir Trust: हंगामी सरचिटणीसांची अयोध्येतील एसबीआयच्या शाखेला भेट, सोने-चांदीसह मौल्यवान वस्तूंची पाहणी

93
Ram Mandir, Ayodhya परिसरातील ३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या, महत्त्वपूर्ण प्रशासकीय बदलाचे कारण जाणून घ्या...
Ram Mandir, Ayodhya परिसरातील ३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या, महत्त्वपूर्ण प्रशासकीय बदलाचे कारण जाणून घ्या...

Ram Mandir Trust: अयोध्येतील श्रीराम मंदिर ट्रस्टचे हंगामी सरचिटणीस कृष्ण मोहन यांनी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या किमतीच्या सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंच्या वस्तूंसह त्यासंबंधित नोंदीची पाहणी केली,अशी माहिती संबंधित सूत्रांनी मंगळवारी दिली.

सूत्रांच्या माहितीनुसार, हंगामी सरचिटणीस कृष्ण मोहन यांनी सोमवारी सायंकाळी अयोध्येतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला भेट दिली. ते रात्री उशिरापर्यंत तेथे उपस्थित होते. यावेळी लॉकरमध्ये ठेवलेल्या मौल्यवान वस्तूंची यादी तयार करण्यात आली तसेच सोने,चांदी आणि इतर मौल्यवान धातूंच्या वस्तूंची छायाचित्रेही घेण्यात आली असे पीटीआयच्या वृत्तात सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – Medical Strike : ‘दोन तास थांबली रुग्णसेवा’; राज्यभरातील शासकीय परिचारिकांनी सरकारला दिला इशारा

गेल्या तीन दिवसांपासून कृष्ण मोहन ट्रस्टच्या खात्यांच्या वह्या आणि इतर नोंदींची पडताळणी करत होते. त्यानंतर ट्रस्टच्या निधीची तसेच मौल्यवान धातूंची अंतिम यादी तयार करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले. राम मंदिरातील देणग्यांच्या कथित अपहारप्रकरणी सर्वौच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर स्थापन करण्यात आलेले विशेष तपास पथक (एसआयटी) मंगळवारपासून पुन्हा आपल्या कामाला सुरुवात करणार असल्याची अपेक्षा असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

बँकेला दिलेल्या भेटीबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना कृष्ण मोहन यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. राम मंदिरातील व्यवस्थेबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘तुम्ही सर्वजण या, दर्शन घ्या आणि स्वतः पाहा. काही कमतरता आढळल्यास आम्हाला जरूर सांगा.’

राम मंदिरातील देणग्यांच्या कथित अपहाराचे प्रकरण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उघडकीस आले होते. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने १३ जून रोजी या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले होते. सुरुवातीला या पथकाला चौकशीसाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता.

एसआयटीने २३ जून रोजी प्राथमिक अहवाल सादर केल्यानंतर २५ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, मनीष कुमार यादव, करुणेश पांडेय, रामाशंकर मिश्रा, सुभाष श्रीवास्तव आणि रामाशंकर यादव उर्फ टिन्नू यादव या आठ आरोपींना अटक करण्यात आली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.