Sand registration: वाळू खरेदीसाठी आता तहसीलदारांकडे ऑनलाइन नोंदणी बंधनकारक, काय आहे नवे धोरण?

73
Sand registration: वाळू खरेदीसाठी आता तहसीलदारांकडे ऑनलाइन नोंदणी बंधनकारक, काय आहे नवे धोरण?
Sand registration: वाळू खरेदीसाठी आता तहसीलदारांकडे ऑनलाइन नोंदणी बंधनकारक, काय आहे नवे धोरण?

Sand registration: खाडी किनारी वाळूमाफिया हैदोस घालतात तो रोखण्यासाठी आता खासगी किंवा शासकीय इमारत बांधतांना वाळूची ऑनलाइन नोंद करून ती खरेदी करावी लागेल असे महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी आज रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या समाधान शिबिरासाठी महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे रत्नागिरीत आले होते.

डिसेंबरच्या अधिवेशनात आधी मोजणी, नंतर नोंदणी आणि त्यानंतर फेरफार असा लँड टायटलिंग कायदा आणणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी सांगितले. नवीन कायद्यामध्ये जमिनीच्या व्यवहारात पारदर्शकता येईल असे महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. बीड जिल्ह्यात झालेल्या. तलाव घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. संगमेश्वर तहसीलदारांबाबत अनेक तक्रारी होऊन त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. महसूल खाते पूर्वीपासूनच बदनाम होते, त्यामध्ये बदल करून ते सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचे चंद्रकांत बावनकुळे यांनी सांगितले.

नवीन धोरण
– वाळू व्यवसायावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने वितरणाचे नवी धोरण जाहीर केले आहे.
– प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना शासनांतर्गत पाच ब्रास वाळूपर्यंत वाळूचे वितरण करण्यात येणार आहे.
– वाळू खरेदी करण्यासाठी प्रत्येकाला ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. यासाठी महाखनिज पोर्टलवर वाळू नोंदणी करावी लागते.
– या पोर्टलवर मोबाईल नंबर आणि इतर माहिती टाकून आपली नोंदणी करून घ्यायची आहे. तसेच फोटो आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत. त्यामुळे कमी किमतीमध्ये वाळू उपलब्ध होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.