‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर प्रशासनाने आता कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. वर्षाला अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांसाठी दरमहा दीड हजार रुपये देण्याची ही योजना होती. मात्र, काही पुरुषांनी तसेच उत्पन्न मर्यादा ओलांडणाऱ्या महिला आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी खोटी माहिती देऊन या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आता अशा अपात्र लाभार्थ्यांकडून आत्तापर्यंत वाटप केलेल्या सर्व रकमेची पूर्ण वसुली करण्याचा धडक निर्णय प्रशासनाने घेतला आहे. (Ladki Bahin)
(हेही वाचा – Anil Ambani यांचा आणखी एक कारनामा; एलआयसी, सरकारी, खाजगी बँकांनंतर आता EPFO लाही लावले धंद्याला)
चुकीच्या अर्जांचे वर्गीकरण आणि वसुली प्रक्रिया
छाननीदरम्यान अधिकाऱ्यांकडून अपात्र अर्जांचे दोन मुख्य भागांमध्ये वर्गीकरण केले जात आहे. अनावधानाने किंवा तांत्रिक चुकीमुळे ज्यांनी अर्ज भरले आहेत, त्यांची खाती तातडीने बंद करून त्यांच्याकडून रक्कम परत मिळवली जाईल. मात्र, ज्यांनी केवळ पैशांच्या लालसेने जाणीवपूर्वक सत्य माहिती लपवून किंवा प्रशासनाची दिशाभूल करून या आर्थिक लाभाचा अपहार केला आहे, त्यांच्यावर पूर्ण रकमेच्या वसुलीसह कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. (Ladki Bahin)
(हेही वाचा – Anil Ambani यांचा आणखी एक कारनामा; एलआयसी, सरकारी, खाजगी बँकांनंतर आता EPFO लाही लावले धंद्याला)
बनावट पुरावे आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत
या कल्याणकारी योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय नियमांनुसार सेवांतर्गत कारवाई केली जाणार असून त्यांच्या निलंबनाची शक्यताही वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे, संगणकीय प्रणालीवर दिशाभूल करण्यासाठी खोटे पुरावे सादर करणाऱ्या, आधार कार्ड किंवा इतर अधिकृत कागदपत्रांमध्ये फेरफार करणाऱ्या व्यक्तींवर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हे नोंदवले जाण्याची शक्यता आहे. पात्र आणि गरजू महिलांपर्यंतच या योजनेचा लाभ पोहोचावा यासाठी शासनस्तरावर ही स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

