‘राज ठाकरे स्टँडअप कॉमेडियन झालेत!’ भाजपा मुंबई अध्यक्ष Amit Satam यांचा आक्रमक पलटवार

69
Amit Satam and Raj Thackeray during a political debate.
Amit Satam responds to Raj Thackeray's comments.

भाजपा आणि मनसे नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध झाले. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अमित साटम (Amit Satam) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत प्रहार केला आहे. ज्या राजकीय पक्षाचा सध्याच्या काळात एकही संसद अथवा विधानसभेत उमेदवार नाही, त्यांनी इतर ज्येष्ठ नेत्यांच्या बौद्धिक क्षमतेवर आणि कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी मनसेला त्यांची जागा दाखवून दिली आहे.  (Amit Satam)

(हेही वाचा – Jammu-Kashmir: कुलगाममधील दहशतवादी हल्ल्यात छत्तीसगडच्या दुसऱ्या मजुराचाही मृत्यू)

अमित साटम यांचा पलटवार
दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर भाजपा नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिल्ली पोलिसांच्या ‘ॲडव्हान्स तपासा’बाबत मोठा दावा केला होता. “पोलिसांनी जंतरमंतर परिसरात पडलेला प्रत्येक दगड गोळा केला आहे. त्या दगडांवर असणारे ठसे आता आधार कार्डशी लिंक केले जातील,” असे ते म्हणाले होते. यावरून राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरील फिंगरप्रिंट तपासावे लागतील, असा टोला लगावला होता. राज ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार अमित साटम यांनी शनिवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना घेतला. या विधानाचा तीव्र निषेध करत अमित साटम यांनी पलटवार केला की, आता राज ठाकरे यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट तपासण्याची खरी वेळ आली आहे. असे विधान केले.

(हेही वाचा –CJP सरकारच्या रडारवर, फॉरेन फंडिंगची सखोल चौकशी होणार; मंत्र्यांचा थेट इशारा!)

मनोरंजन आणि विकासाच्या मुद्द्यांवरून थेट आव्हान
मनसे प्रमुखांवर पलटवर करताना भाजपा नेत्यांनी त्यांना केवळ एक स्टँडअप कॉमेडियन म्हटले आहे. केवळ घरात बसून पत्रके काढणे आणि उरलेल्या मोजक्या कार्यकर्त्यांसमोर भाषणे ठोकणे यापलीकडे त्यांच्याकडे कोणताही ठोस कार्यक्रम नाही, असा आरोप अमित साटम यांनी केला. केंद्र सरकारने राबवलेल्या विविध कौशल्य विकास योजना आणि नवउद्योजकांसाठीच्या मोहिमांमुळे देशाची आर्थिक प्रगती वेगाने होत आहे. मनसेने केवळ अभिनयाचा आव न आणता रोजगाराच्या मुद्द्यावर आणि मेरिटवर थेट चर्चा करून दाखवावी, असे खुले आव्हान आता अमित साटम यांनी केले आहे.

हेही पहा –


Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.