Saffron Jersey Row : हॉकी संघाच्या भगव्या जर्सीमुळे झालेला वाद चिघळला, हॉकी इंडियाने उचलली पावलं

Saffron Jersey Row : हॉकी संघाच्या भगव्या जर्सीमुळे झालेला वाद चिघळला, हॉकी इंडियाने उचलली पावलं

83
Saffron Jersey Row : हॉकी संघाच्या भगव्या जर्सीमुळे झालेला वाद चिघळला, हॉकी इंडियाने उचलली पावलं
Saffron Jersey Row : हॉकी संघाच्या भगव्या जर्सीमुळे झालेला वाद चिघळला, हॉकी इंडियाने उचलली पावलं
  • ऋजुता लुकतुके

भारतीय हॉकी संघाच्या पारंपरिक निळ्या जर्सीऐवजी भगवी जर्सी(Saffron Jersey Row)वापरण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेला वाद आता हॉकी इंडियाच्या अंतर्गत पातळीवर पोहोचला आहे. हॉकी इंडिया अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी या निर्णयाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितले असून, जर्सी रंगबदलाचा निर्णय कार्यकारिणी मंडळाच्या मंजुरीशिवाय घेण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.(Saffron Jersey Row)

तिर्की यांनी हॉकी इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवत या निर्णयामागील प्रक्रिया, मंजुरी आणि कारणांची माहिती मागवली आहे. राष्ट्रीय संघाच्या ओळखीशी संबंधित इतका महत्त्वाचा निर्णय कार्यकारिणी मंडळाशी चर्चा न करता कसा घेण्यात आला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.(Saffron Jersey Row)

हॉकी इंडियाने अलीकडेच एफआयएच हॉकी विश्वचषक २०२६साठी भारतीय पुरुष आणि महिला संघाची प्राथमिक जर्सी भगवी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. महासंघाने या बदलामागे तांत्रिक कारणे असल्याचे सांगितले होते. निळ्या कृत्रिम खेळपट्ट्यांवर निळी जर्सी स्पष्टपणे दिसत नसल्याने दृश्यमानता सुधारण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.(Saffron Jersey Row)

(हेही वाचा – Barvi Dam ८३.७४ टक्के भरले; ओव्हरफ्लोला अवघे १.९० मीटर शिल्लक )

मात्र तिर्की यांनी स्पष्ट केले की, त्यांचा आक्षेप भगव्या रंगाला नसून निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला आहे. भारतीय हॉकीची परंपरा, ओळख आणि ब्रँड मूल्य लक्षात घेता अशा निर्णयांवर व्यापक चर्चा होणे आवश्यक होते, असे त्यांनी नमूद केले.(Saffron Jersey Row)

या प्रकरणात अनेक माजी हॉकीपटूंनीही नाराजी व्यक्त केली आहे. धनराज पिल्ले यांनी निळी जर्सी ही भारतीय हॉकीची ओळख असल्याचे सांगत रंगबदलाला विरोध केला होता. वीरेन रस्किन्हा यांनीही राष्ट्रीय संघाची परंपरा जपली पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.(Saffron Jersey Row)

दरम्यान, हॉकी इंडियामध्ये या निर्णयावरून मतभेद वाढल्याची चर्चा आहे. काही अधिकाऱ्यांनी हा निर्णय खेळाडूंच्या कामगिरीसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले असले, तरी कार्यकारिणी मंडळातील काही सदस्यांनी प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.(Saffron Jersey Row)

एफआयएच हॉकी विश्वचषक २०२६ काही आठवड्यांवर येऊन ठेपला असताना, जर्सी रंगबदलाचा निर्णय आणि त्यामागील प्रक्रिया यावरून हॉकी इंडियाच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता टिर्की यांनी मागवलेल्या स्पष्टीकरणानंतर या वादावर काय निर्णय होतो, याकडे भारतीय हॉकी विश्वाचे लक्ष लागले आहे.(Saffron Jersey Row)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.