मुल्ला मुनीरच्या आदेशावरून Balochistan मध्ये ४८ तासांत ४० जणांची हत्या; गाडीच्या बोनेटवर तरुणीचा मृत्यूदेह ठेवून फिरवला

बलुचिस्तानने (Balochistan)   एकप्रकारे स्वतःला एक स्वतंत्र देश म्हणून घोषित केले आहे. यानंतर, तेथील लोकांवर सर्व प्रकारचे अत्याचार केले जात आहेत. ५ जुलै रोजी सुरू केलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या नावाखाली, मुनीरच्या सैन्याने किमान ८८ बलुच लोकांची हत्या केली आहे.

56

पाकिस्तानचा लष्करशाह मुल्ला असीम मुनीरच्या आदेशावरून पाकिस्तानचे सैन्य बलुचिस्तानपासून (Balochistan) पाकिस्तानव्याप्त काश्मीरपर्यंत (POK) धुमाकूळ घालत आहे, गाडीच्या बोनेटवर एका मुलीचा मृतदेह ठेवून तो फिरवला. ४८ तासांत ४० लोकांची हत्या केली. यावर आता संयुक्त राष्ट्राने चिंता व्यक्त केली.

एका चिलखती वाहनाच्या बोनेटवर एका मुलीचा मृतदेह आणि त्यानंतर चिलखती वाहनांचा ताफा. हे एखाद्या चित्रपटातील दृश्य नाही, तर बलुचिस्तानच्या (Balochistan)   लोकांना घाबरवण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने वापरलेली एक युक्ती आहे. या अमानुष सैन्याने एका निष्पाप मुलीला गोळ्या घातल्या, त्यानंतर तिचा मृतदेह एका चिलखती वाहनाच्या बोनेटवर ठेवून बलुचिस्तानच्या (Balochistan)   रस्त्यांवरून त्याची धिंड काढली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकिस्तानी सैन्य अनेक वर्षांपासून बलुचिस्तानच्या लोकांचे शोषण करत आहे. बलुचिस्तानपासून पाकिस्तान व्याप्त काश्मीरपर्यंत (POK) आसिम मुनीरच्या सैन्याने केलेल्या अत्याचारांविरुद्ध अलीकडील आंदोलने हा लोकांचा आवाज आहे. बलुचिस्तानने (Balochistan)   एकप्रकारे स्वतःला एक स्वतंत्र देश म्हणून घोषित केले आहे. यानंतर, तेथील लोकांवर सर्व प्रकारचे अत्याचार केले जात आहेत. ५ जुलै रोजी सुरू केलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या नावाखाली, मुनीरच्या सैन्याने किमान ८८ बलुच लोकांची हत्या केली आहे. बलुच (Balochistan)   नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. लहान मुले आणि तरुणांचे अपहरण करून त्यांना बेपत्ता केले जात आहे, आणि मुलींचा अपमान करून त्यांची हत्या केली जात आहे.

(हेही वाचा Heavy Rain : महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा; भारतातील २२ राज्यांना हवामान खात्याचा इशारा)

पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये (PoK) धुमाकूळ 

पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये (PoK) JAAC च्या निषेध मोर्चादरम्यान, पाकिस्तानी लष्कर आणि रेंजर्सनी अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात ४० जण ठार आणि २०० हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. यानंतर, POK मध्ये अशांतता पसरली असून, हे प्रकरण संयुक्त राष्ट्रांपर्यंत पोहोचले आहे. संयुक्त राष्ट्रांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली असून JAC नेत्यांना कायदेशीर मदत देऊ केली आहे. JAC ने पाकिस्तानवर मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप करत संयुक्त राष्ट्रांकडे अपील केले होते.

संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार प्रमुख वोल्कर तुर्क यांनी पाकिस्तानला संयम बाळगण्याचे, इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आणि शांततापूर्ण सभा घेण्याच्या अधिकाराचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. महागाई, वीजपुरवठा खंडित करणे आणि हक्कांसाठीच्या आंदोलनादरम्यान पाकिस्तानने आंदोलकांवर गोळीबार केला, ज्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मानवाधिकार संघटनांनी तपास तीव्र केला आहे.

गेल्या ५३ दिवसांत १०० हून अधिक मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, ज्यात गेल्या ४८ तासांत ४० मृत्यूंचा समावेश आहे. अटक केलेल्या नेत्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी भेटावे अशी मागणी JAC ने केली आहे. तसेच इस्लामिक देशांच्या संघटनेला (ओआयसी) तात्काळ हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. जेएएसीने ओआयसी आणि संयुक्त राष्ट्रांना पाठवलेल्या पत्रात, पाकिस्तानी लष्कराने लादलेल्या निर्बंधांचे सविस्तर वर्णन केले आहे आणि लोकशाही पुनर्स्थापित करण्याची मागणी केली आहे. (Balochistan)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.