BJP on Sanjay Raut : संजय राऊत, तुमच्या अहंकाराच्या लंकेचे दहन अटळ; भाजपाचा खणखणीत प्रहार

65
गणेशोत्सवावरून Sanjay Raut यांना भाजपाचा थेट इशारा; म्हणाले...
गणेशोत्सवावरून Sanjay Raut यांना भाजपाचा थेट इशारा; म्हणाले...
  • प्रतिनिधी

BJP on Sanjay Raut             ​रामरक्षा आंदोलनाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला आहे. रामरक्षेचे श्लोक नीट म्हणता न येणाऱ्यांनी हिंदुत्वाचा आव आणू नये, अशी टीका करत, जनतेच्या सेवेपेक्षा सत्ता वाचवण्याचे ‘पक्षरक्षा’ आंदोलन तुम्ही करत आहात, असा थेट आरोप बन यांनी केला आहे. (BJP on Sanjay Raut)

​मुंबई महापालिकेतील २५ वर्षांच्या कथित लुटालुटीचा दाखला देत, संजय राऊत आणि त्यांच्या शिवसेना उबाठाची कार्यपद्धती म्हणजे केवळ ‘ठेकेदारी, कमिशनखोरी आणि वसुली’ असल्याचे बन यांनी म्हटले. “आम्ही रस्त्यावर उतरून लोकांची सेवा करतो, तर तुम्ही घरात बसून राजकारण करता,” असे म्हणत त्यांनी राऊत यांच्यावर बोचरी टीका केली. तसेच, लोणावळ्यातील दरड कोसळल्याच्या घटनेबाबत बोलताना, निसर्गाचा कोप सरकारच्या हातात नसला तरी, युद्धपातळीवर मदतकार्य करण्याचे काम सरकार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (BJP on Sanjay Raut)

(हेही वाचा – Indian Economy : भारतीय मध्यमवर्ग ठरणार देशासाठी विकासाचं इंजिन, कसा ते जाणून घ्या)

​मानखुर्द येथील घर कोसळण्याच्या दुर्घटनेचा संदर्भ देत बन म्हणाले की, “संकटाच्या वेळी घराबाहेर पडून पीडितांना मदत करणारे आम्ही आहोत, केवळ कागदी घोडे नाचवणारे नाही.” पत्राचाळ घोटाळ्याचा उल्लेख करत, ज्यांनी हजारो कोटी लुटले त्यांनी भाजपाला शहाणपण शिकवू नये, असा इशाराही त्यांनी दिला. (BJP on Sanjay Raut)

​महाभारतातील संदर्भाचा वापर करून त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार शब्दांत शरसंधान साधले. “ज्यांच्यासोबत ‘संजय’ असतो, तो दुर्योधन आणि कौरव असतो. तुम्ही कौरवांप्रमाणे मुंबई लुटली, पण आता पांडवांचे म्हणजे जनतेच्या सेवेसाठी झटणाऱ्यांचे राज्य आहे,” असे सांगत, राऊत यांच्या अहंकाराची लंका जनता लवकरच भस्मसात करेल, असे विधान बन यांनी केले. (BJP on Sanjay Raut)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.