खासदार Dr. Shrikant Shinde यांचा यशस्वी पाठपुरावा; ऐरोली-काटई मार्गाचे दोन टप्पे जुलैमध्ये प्रवाशांच्या सेवेत

102
सावंतवाडी रोड स्थानकावर गरीब रथसह ३ महत्त्वाच्या एक्स्प्रेसना थांबा; Dr. Shrikant Shinde यांच्या पाठपुराव्याला यश
  • डोंबिवली, प्रतिनिधी

Dr. Shrikant Shinde                  नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसरातील लाखो नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा देणाऱ्या ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून हे दोन्ही टप्पे जुलै महिन्यात वाहतुकीसाठी खुले करण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केले आहे. मात्र ही सारी किमया संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी साधली आहे. खासदारांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रस्त्यांच्या प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून आता या मार्गाचा महत्त्वाचा भाग नागरिकांच्या सेवेत दाखल होण्याची चिन्हे आहेत. (Dr. Shrikant Shinde)

ऐरोली-काटई उन्नत मार्ग एकूण १२.७२ किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गामुळे ऐरोली ते डोंबिवलीदरम्यानचे अंतर सुमारे १० किलोमीटरने कमी होणार असून प्रवासासाठी लागणारा ३० ते ४५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे. संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबई ते डोंबिवली हे अंतर अवघ्या १५ मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. महापे, शिळफाटा, कल्याण फाटा तसेच ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार आहे. मुलुंड-ऐरोली पूल, ठाणे-बेलापूर मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग-चार यांच्यात अखंड व जलद संपर्क निर्माण होणार असल्याने दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांचा वेळ, इंधन आणि प्रवासाचा खर्च वाचणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील मालवाहतुकीलाही या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. (Dr. Shrikant Shinde)

(हेही वाचा – Indian Economy: जागतिक संकटातही भारताची घोडदौड कायम! ‘जगाच्या अर्थव्यवस्थेचा चालक’ म्हणत IMFने केलं कौतुक)

समन्वयातून प्रकल्पाला गती

रस्त्यांच्या प्रकल्पांत विलंब होऊ नये यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सुरूवातीपासूनच लक्ष घातले आहे. एमएमआरडीए मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत वारंवार आढावा बैठका घेऊन कामाच्या प्रगतीचा पाठपुरावा केला. प्रकल्पस्थळी वेळोवेळी भेटी देत कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी वारंवार सूचना दिल्या. विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधत कामाचा वेग वाढवला. या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच आता प्रकल्पाच्या पहिल्या दोन टप्प्यांचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आले आहे. (Dr. Shrikant Shinde)

ऐरोली-ठाणे-बेलापूर रस्त्याच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण

या प्रकल्पातील ठाणे-बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग-४ या ३.४३ किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे ९२ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून उर्वरित किरकोळ कामे अंतिम टप्प्यात आहेत. ऐरोली ते ठाणे-बेलापूर रस्ता या २.५७ किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही टप्प्यांचे उद्घाटन करून ते एकाच वेळी जुलैत वाहतुकीसाठी खुले करण्याचे नियोजन एमएमआरडीएने केले आहे. (Dr. Shrikant Shinde)

(हेही वाचा – कल्याण-डोंबिवलीत कचरा व्यवस्थापन मोहिमेला वेग; Dombivli च्या त्रिमूर्ती नगरातील रस्त्यांसह घरोघरी जनजागृती)

ऐरोली-काटई उन्नत मार्ग अंतिम टापूत

राष्ट्रीय महामार्ग-चार ते काटई नाका या ६.७१ किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या टप्प्याचे कामही सुरू झाले असून हा टप्पा येत्या एक ते दीड वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हा अंतिम टप्पा पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण १२.७१ किलोमीटरचा ऐरोली-काटई उन्नत मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध होईल. जुलै महिन्यात पहिला आणि दुसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबई महानगर प्रदेशातील दळणवळण अधिक सक्षम आणि वेगवान करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. (Dr. Shrikant Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.