…तर देशाचा विनाश अटळ! रणजीत सावरकर यांनी का दिला इशारा?

111

जी फाळणी वीर सावरकर टाळू शकले नाही, ती फाळणी पुन्हा होऊ नये, म्हणून ‘वीर सावरकर : द मन हू कूड हॅव प्रिवेंटेड द पार्टीशन’ हे पुस्तक मार्गदर्शक आहे. कृष्ण येणार अशी आपल्या हिंदूंची श्रद्धा आहे, पण लढाईत कृष्णाने शस्त्र हाती घेतले नव्हते, पांडवांनाच लढावे लागले होते, तसे आपल्यालाच लढावे लागणार आहे. १९१९ मध्ये गांधींनी खिलाफत चळवळीत मुसलमानांना पाठिंबा देऊन विकृत प्रयत्न केला आणि त्यांच्यातील धर्मांधता वाढवली. परिणामी भारतात हिंदूंवर अनन्वय अत्याचार केले गेले. त्याची पुनरावृत्ती दिल्ली दंगलीत झाली. फाळणीच्या वेळी मुस्लिम लोकसंख्या ३५ टक्के होती, आज त्यांची संख्या २२ टक्के बनली आहे. उद्या ३५ टक्के होईल आणि दुसरी फाळणी होईल, पण तेव्हा गांधींचे नेतृत्व होते, सुदैवाने आज नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आहे, मात्र त्यासाठी २०२४ मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी निवडून आलेच पाहिजे, हे हिंदुत्ववादी विचारांचे सरकार गेले, तर देशाचा विनाश अटळ आहे, असा इशारा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी दिला.

Book publication

१९१९ साली गांधींचा विकृत प्रयोग

इतिहासातून आपण काय शिकले पाहिजे, काय चुका टाळल्या पाहिजेत, याचा अभ्यास केला पाहिजे. सावरकर १९३७ साली राजकारणात सक्रिय झाले, गांधी १९१९ साली झाले. १९१९ – १९३७ पर्यंत गांधींना भारतीय राजकारणात पूर्ण मोकळीक मिळाली होती. त्यांच्या विचारांना विरोध करणारा कोणता नेता नव्हता, त्यामुळे भारतीय राजकारण म्हणजे गांधी, गांधी म्हणजे काँग्रेस अशी स्थिती होती. म्हणूनच गांधींनी जाणीवपूर्वक १९१९ मध्ये राष्ट्रीय ऐक्याच्या नावाने विकृत प्रयोग केला. तो म्हणजे खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला, असे रणजीत सावरकर म्हणाले.

(हेही वाचा मोदी युग आणि सावरकर युग एकच! देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन)

सीएए कायद्याविरोधात आंदोलन इतिहासाची पुनरावृत्ती

महायुद्धानंतर तुर्कस्थानच्या खलिफाची गादी बरखास्त करण्यात आली होती. कमाल पाशा या तुर्कस्थानी व्यक्तीने तिथे राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला. त्याने बंड केले, तो राष्ट्राध्यक्ष झाला. त्याला ब्रिटिशांचे समर्थन होते. या घटनेचे जगातील कोणत्याही राष्ट्राला सोयरसुतक वाटले नव्हते. फक्त भारतातील मुसलमानांना दु:ख झाले. त्यातील महंमद अली आणि शौकत अली यांनी राजकारणात प्रवेश मिळावा आणि हिंदू-मुस्लिम पाठिंबा मिळावा म्हणून त्यांनी भारतात खिलाफत चळवळ सुरु केली. काँग्रेसचा खिलाफतला पाठिंबा दिला नव्हता, पण गांधींनी खिलाफतला पाठिंबा देऊन खिलाफत परिषदेचे अध्यक्ष बनले आणि मुसलमानांना दंगली करण्यास प्रोत्साहित केले. प्रकरण केमाल पाशाचे होते, ब्रिटिशांनी पाठिंबा दिला होता, घटना तुर्कस्थानाची होती, दंगली मात्र भारतातील हिंदूंविरोधात केल्या. त्यावेळी हिंदू महिलांवर अमाणूष अत्याचार केले. केरळमध्ये २ जिल्ह्यांत तर जिहाद पुकारला होता, हिंदूंचा नरसंहार केला होता. अशा दंगलींची पुनरावृत्ती सीएए कायद्याच्या विरोधात दिल्लीत पाहायला मिळाली. त्या दंगलीचा विषय होता सीएए कायदा. तो काय भारतातील मुसलमानांशी संबंधित नव्हता. तो विषय पाक, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील हिंदू नागरिकांशी संबंधित होता. याविरोधात भारतात दंगल केली, हिंदूंना ठार केले. त्याचे समर्थन काँग्रेस करते, शंभर वर्षाने इतिहासाचे चक्र पूर्ण झाले आहे, असे रणजीत सावरकर म्हणाले.

इतिहासातील चुका टाळा

फाळणीच्या वेळी १९४७ मध्ये मुस्लिम लोकसंख्या ३५ टक्के होती, फाळणीनंतर जनगणना झाली, तेव्हा लोकसंख्या ८ टक्के होती. आज शंभर वर्षांनंतर मुसलमानांची संख्या पुन्हा २२ टक्के झाली आहे, ती पुन्हा ३५ टक्के होईल आणि शंभर वर्षांपूर्वी भारताच्या मुसलमानांनी याच लोकसंख्येच्या जोरावर फाळणी केली आणि ८० टक्के मुसलमान देशाबाहेर गेले होते, त्याची पुनरावृत्ती होईल. शंभर वर्षापूर्वीप्रमाणेच पुन्हा फाळणी होऊ द्यायची नसेल, तर आपण आपल्या चुका टाळल्या पाहिजेत. १९२० साली गांधींचे नेतृत्व होते, सुदैवाने आज आपल्याकडे नरेंद्र मोदींचे नेतृत्व आहे. मोदी करत आहेत, पण आम्ही काही करायचे नाही का? २०१४ साली हिंदुत्ववादी विचारांच्या पक्षाचे सरकार सत्तेवर आले, तेव्हा चमत्कार झाले. ते चमत्कार पुन्हा व्हायचे असतील, तर २०२४ साली पुन्हा निवडून यावे लागेल. कांदा-बटाट्यावरून तुम्ही सरकारे पाडता, लाज वाटली पाहिजे. ५ रुपयाने वीज देतो म्हटल्यावर सरकार बदलता, हे सरकार गेले आणि आणखी कुणाचे सरकार आले तर हा देशाचा विनाश ठरेल, राष्ट्र टिकेल, तर सगळे टिकणार आहे, असे रणजीत सावरकर म्हणाले.

(हेही वाचा काँग्रेसच्या मुस्लिम तुष्टीकरण नीतीमुळे देशाची फाळणी!)

‘वीर सावरकर : द मन हू कूड हॅव प्रिवेंटेड द पार्टीशन’ पुस्तकाचे प्रकाशन 

केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर लिखित ‘वीर सावरकर : द मन हू कूड हॅव प्रिवेंटेड द पार्टीशन’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकाचे सह लेखक हे सुप्रसिद्ध कवी चिरायू पंडित आहेत. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर, सह लेखक चिरायू पंडित, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, भाजपाचे नेते आशिष शेलार आणि भाजपचे नेते अतुल भातखळकर उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थितीत मान्यवरांचे अंदमान कारागृहातील कोल्हूचे प्रतिकात्मक स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या आरंभी पुस्तकाविषयी संक्षिप्त माहिती देणारी छोटी चित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर मान्यवरांनी व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. प्रसिद्ध गायिका मुग्धा वैंशपायन यांनी वीर सावरकर यांनी लिहिलेले ‘ने मजसी ने परत मातृभूमीला। सागरा प्राण तळमळला’ हे गीत गायले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.