सीमाशुल्क विभागाने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Delhi Airport) एक मोठी कारवाई केली. मलेशियाहून (Malaysia) आलेल्या एका प्रवाशाकडून कोट्यवधी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले. त्याने हे अमली पदार्थ (Drugs) आपल्या ट्रॉली बॅगमध्ये लपवले होते, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ३४.६७ कोटी रुपये आहे. सीमाशुल्क अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी त्याला गेटवरच थांबवले. तपासणीदरम्यान, त्याच्या बॅगेत अमली पदार्थांची चार पाकिटे सापडली. यानंतर, सीमाशुल्क विभागाने तात्काळ कारवाई करत हा माल जप्त केला.
(हेही वाचा – Rajmata Jijau Women’s Empowerment Scheme : केवळ ‘एक रुपया’ भाड्यात महिला बचत गटांना मिळणार हक्काची जमीन)
सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी सांगितले की, जप्त केलेल्या हेरॉईनचे वजन ६.९३४ किलोग्रॅम होते. विभागाने ग्रीन चॅनलमधील प्रोफाइलिंगच्या आधारे हे जप्त केले. सीमाशुल्क विभागाच्या माहितीनुसार, १६ जून २०२६ रोजी क्वालालंपूरहून OD-205 या विमान क्रमांकाने दिल्लीत आलेल्या एका भारतीय प्रवाशावर अधिकाऱ्यांना प्रोफाइलिंगच्या आधारे संशय आला होता. प्रवाशाला टर्मिनल ३ च्या ग्रीन चॅनलवर थांबवण्यात आले. प्रवाशाच्या सामानाची तपासणी करत असताना, सीमाशुल्क अधिकाऱ्यांना (Customs Officers) काही संशयास्पद हालचाली लक्षात आल्या. त्यानंतर प्रवाशाच्या दोन ट्रॉली बॅगांची कसून तपासणी करण्यात आली.
एनडीपीएस कायदा, १९८५ च्या तरतुदींनुसार प्रवाशाला अटक करण्यात आली आणि संशयित हेरॉईन व पॅकेजिंग साहित्य जप्त करण्यात आले. आता पुढील तपास सुरू आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

