Dombivli : नगरसेवकाच्या आंदोलनाची एमएमआरडीएकडून दखल; सुभाष रोडचे काँक्रिटीकरण युद्धपातळीवर सुरू

165
स्थानीय नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे सुभाष रोडच्या काँक्रिटीकरणाच्या कामाची पाहणी करत आहेत.
Dombivli : नगरसेवकाच्या आंदोलनाची एमएमआरडीएकडून दखल; सुभाष रोडचे काँक्रिटीकरण युद्धपातळीवर सुरू
  • कल्याण, प्रतिनिधी

Dombivli              पश्चिम डोंबिवलीतील सुभाष रोडच्या काँक्रीटीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले होते. अतिशय संथगतीने चाललेल्या या कामामुळे रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या रहिवाशांसह दुकानदार, व्यापारी आणि वाहनचालक हैराण झाले होते. दहा दिवसांपूर्वी मनसेचे डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे आणि त्यांची कन्या ॲड. वेदांगी म्हात्रे यांनी सुभाष रोडवर भर रस्त्यात कडक उन्हात बेमुदत उपोषण सुरू करून हा रस्ता पावसाळ्यापूर्वी पूर्ण केल्याचे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सोडण्यास नकार दिला. आता या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आल्याने परिसरातील साऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. (Dombivli)

एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांना रस्त्याच्या मार्गात येणाऱ्या तांत्रिक अडथळ्यांची माहिती दिली. पाऊस सुरू होण्यापूर्वी सुभाष रोडचे काँक्रिटीकरण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनाप्रमाणे एमएमआरडीएच्या ठेकेदाराने अभियंत्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे सुभाष रस्ता भागातील सर्व अडथळे दूर करून काम सुरू केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू केल्याने स्थानिक रहिवासी, व्यापारी, रिक्षा चालक संघटनांनी समाधान व्यक्त करताना नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे आणि त्यांची कन्या ॲड. वेदांगी म्हात्रे यांचे आभार मानले आहेत. (Dombivli)

(हेही वाचा – Maharashtra Police Forceआता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज होणार, मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती)

काँक्रीटीकरणासाठी रस्त्याची नांगरट

सुभाष रोडवर जागोजागी खड्डे असल्याने रिक्षा चालकांना पर्यायी रस्त्याने प्रवासी वाहतूक करावी लागत होती. त्यामुळे हा रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी गेल्या काही महिन्यांपासून रिक्षा संघटनांनी एमएमआरडीएकडे केली होती. काँक्रीटीकरणासाठी हा रस्ता जागोजागी खणून ठेवला होता. त्यामुळे रस्त्यावरील धूळ घरांत आणि दुकानांत येत असल्याने रहिवासी व व्यापारी त्रस्त आहेत. रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी या सर्व अडचणी मनसेचे ज्येष्ठ नेते तथा स्थानिक नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांना सांगितल्या. नगरसेवक म्हात्रे यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सुभाष रोडचे काँक्रिटीकरण आणि रूंदीकरण वेळेत पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला होता. मात्र याकडे ठेकेदार आणि अधिकारी फारसे लक्ष देत नव्हते. (Dombivli)

(हेही वाचा – Halgaon Agriculture College च्या पाणीटंचाईचा प्रश्न लागणार मार्गी; २६.९१ कोटींच्या योजनेला मिळणार गती)

पावसाळ्यात साऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली असती

पावसाळ्यात खोदलेला आणि धुळीचा रस्ता राहिला तर या रस्त्याशी संबंधित साऱ्यांना चिखलातून मार्गक्रमण करावे लागेल. वाहनांची ये-जा शक्य होणार नाही. साऱ्यांची त्रेधातिरपीट उडेल. या सर्व परिस्थितीला स्थानिक नगरसेवक म्हणून आपणास तोंड द्यावे लागेल, या जाणीवेतून मी स्वतः व कन्या ॲड. वेदांगी म्हात्रे यांनी सुभाष रोडवर भर रस्त्यात उपोषण सुरू केले. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण केल्याचे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सोडण्यास नकार दिला. अखेर या आंदोलनाची गंभीर दखल एमएमआरडीएच्या ठेकेदार आणि अभियंत्यांनी घेतली. आता या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून लवकरच ते पूर्ण होईल, अशी अपेक्षा नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी व्यक्त केली. (Dombivli)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.