
-
प्रतिनिधी
Halgaon Agriculture College पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाच्या पाणीटंचाईचा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. जामखेड तालुक्यातील हाळगाव येथील या महाविद्यालयाला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्पातून पाणी उपसा जलसिंचन योजना राबवण्याचा २६.९१ कोटी रुपयांचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले आहेत. (Halgaon Agriculture College)
(हेही वाचा – मुसलमानांनी ज्ञानवापी आणि कृष्णजन्मभूमी स्वेच्छेने हिंदूंच्या स्वाधीन करावी; माजी एएसआय संचालक K K Muhammed यांचे आवाहन)
विधान भवन, मुंबई येथे आयोजित उच्चस्तरीय बैठकीत सभापती प्रा. राम शिंदे यांनी संबंधित विभागांना कडक सूचना दिल्या. यावेळी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी सचिव परिमल सिंह आणि अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (दूरदृष्यप्रणालीद्वारे) उपस्थित होते. सुमारे आठ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या महाविद्यालयातील पायाभूत सुविधांची अवस्था बिकट असल्याचे बैठकीत निदर्शनास आले. (Halgaon Agriculture College)
(हेही वाचा – बचत गटांना मिळणार १ हेक्टर जमीन, लाखाचे अनुदान; Chandrashekhar Bawankule यांनी सांगितली नवी योजना)
भूसंपादनापासून ते अंतर्गत रस्ते, विश्रामगृहाचे नूतनीकरण, खेळाचे मैदान आणि कुंपणापर्यंतची कामे अद्याप प्रलंबित आहेत. ही कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी कृषी, सार्वजनिक बांधकाम, महसूल आणि जलसंपदा विभागाने समन्वयाने काम करावे, अशा स्पष्ट सूचना सभापतींनी दिल्या. या महाविद्यालयाशी संबंधित सर्व प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावेत, ज्याला तातडीने मंजुरी दिली जाईल, अशी ग्वाही कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे महाविद्यालयाच्या विकासाला आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांना मोठी चालना मिळणार आहे. (Halgaon Agriculture College)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
