Love Jihad : मध्य प्रदेशातील रतलाम येथे एका तरुणाने, आपल्या मित्राच्या अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पीडितेचा दोनदा गर्भपात घडवून आणला, त्यानंतर तिला जबरदस्ती इस्लाम धर्म स्विकारायला लावून करून तिच्याशी निकाह केला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी समीर ऊर्फ मार्बल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.
चाकूचा धाक दाखवून वारंवार अत्याचार
आरोपी समीर हा रामरहीम नगरचा रहिवासी असून त्याच्या वडिलांचे नाव शहजाद आहे. समीरचा आधीपासूनच गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, जानेवारी २०२३ मध्ये जेव्हा ती १६ वर्षांची होते, तेव्हा समीरने तिच्या तिला आपल्या घरी बोलावले. भावाचा मित्र असल्याने तीही विश्वास ठेवून त्याच्याकडे गेली, मात्र तिथे त्याने चाकूचा धाक दाखवून पीडितेवर बलात्कार केला. या दरम्यान जेव्हा ती पहिल्यांदा गरोदर राहिली, तेव्हा आरोपीने तिला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खायला लावल्या आणि ‘कोणाला काही सांगितले तर तुला आणि तुझ्या भावाला जीवे मारीन’ अशी धमकी दिली.
हेही वाचा: Kalyan च्या खडेगोळवलीत रक्तरंजित थरार; भररस्त्यात तरूणावर जीवघेणा हल्ला
बळजबरीने धर्मांतर आणि निकाह
पीडितेच्या म्हणण्यानुसार, समीर सातत्याने पीडितेला ब्लॅकमेल करुन तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण करत राहिला. या काळात त्याने तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारून निकाह करण्यासाठी दबाव आणला. ती दुसऱ्यांदा गरोदर राहिली असता, त्याने तिला एका अज्ञात ठिकाणी नेले आणि तिथे जबरदस्तीने तिच्याशी निकाह केला. निकाहानंतर त्याने तिला आपल्या घरात ठेवले आणि तिच्या माहेरच्या लोकांशी संपर्क तोडून टाकला.
मूल झाल्यानंतरही मारहाण, जीवे मारण्याची धमकी
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, मूल झाल्यानंतरही आरोपी तिला सातत्याने मारहाण करायचा आणि जीवे मारण्याची धमकी द्यायचे. अखेर ८ जून २०२६ या दिवशी या छळाला कंटाळून अखेर पीडिता आपल्या माहेरी निघून आली. माहेरी गेल्यानंतरही समीरने तिच्या घरावार दगडफेक केली. त्यांनंतर कोर्ट चौकात त्याने पीडितेकडून तिचे मूल बळजबरीने हिरावून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु स्थानिक लोकांनी मध्यस्थी करत मुलाला वाचवले.
यानंतर आरोपीने पीडितेच्या भावाला फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. या सर्व त्रासानंतर पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांनी दीनदयाल नगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली.
पोक्सो आणि धर्मपरिवर्तन विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
पहिली घटना घडली तेव्हा पीडिता अल्पवयीन असल्यामुळे, पोलिसांनी याप्रकरणी पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय बलात्कार, जीवे मारण्याची धमकी देणे आणि बळजबरी दुसरा धर्म स्विकारायला लावणे यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
Join Our WhatsApp Community

