Kalyan च्या खडेगोळवलीत रक्तरंजित थरार; भररस्त्यात तरूणावर जीवघेणा हल्ला

73
Mumbai Crime : भांडुपमध्ये गुन्हे शाखेचा छापा; 'पाचवी पास' डॉक्टरकडून रुग्णांवर उपचार!
Mumbai Crime : भांडुपमध्ये गुन्हे शाखेचा छापा; 'पाचवी पास' डॉक्टरकडून रुग्णांवर उपचार!
  • कल्याण, प्रतिनिधी

Kalyan         कल्याण पूर्वेकडे असलेल्या विठ्ठलवाडी-खडेगोळवली परिसरात गुन्हेगार टोळ्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे समोर आले आहे. वडिलांना दुकानात सोडून घरी परतणाऱ्या एका तरूणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात तरूण गंभीर जखमी झाला असून हा तरूण रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. (Kalyan)

कोळसेवाडी परिसरात राहणाऱ्या या तरूणाचे नाव अद्याप कळू शकले नाही. हा तरूण आपल्या वडिलांना त्यांच्या दुकानात सोडण्यासाठी गेला होता. काम आटोपून तो परतत असतानाच सशस्त्र टोळक्याने अचानक त्याला रस्त्यात गाठले. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने या तरूणावर सपासप वार करण्यास सुरूवात केली. अचानक झालेल्या सशस्त्र हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी झालेला तरूण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहताच हल्लेखोरांनी तेथून पोबारा केला. (Kalyan)

(हेही वाचा – Bihar मध्ये पाकिस्तान कनेक्शन उघड; आयएसआय एजंटच्या अटकेनंतर ‘कट्टरपंथी मॉड्युल’ उद्ध्वस्त; अनेक राज्यांमध्ये धाडसत्र सुरू )

घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरूणाला तातडीने जवळच्या रूग्णालयात हलविण्यात आले असून, त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामागे एका टोळीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, ज्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे. विठ्ठलवाडीतील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे सामान्य रहिवासी भयभीत झाले आहेत. पोलिस या टोळक्यांवर काय कारवाई करते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Kalyan)

मागील आठवड्यातच पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी स्वतः खडेगोळवली परिसरात येऊन उच्छाद मांडणाऱ्या टोळक्यांचा समाचार घेतला होता. मात्र तरीही या भागात असाच उन्माद सुरू असल्याचे या घटनेतून दिसून येते. या भागातील बहुतांश तरूण वर्ग अमली पदार्थांच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाल्याची परिसरात चर्चा आहे. पोलिसांनी विठ्ठलवाडी-खडेगोळवली परिसरात आपला वचक बसविण्यासाठी अधिक कठोर पावले उचलावीत, अशी मागणी या भागातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. (Kalyan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.