India’s Asian Games 2026 : आशियाई खेळांसाठी भारताचा टेनिस संघ जाहीर; सुमित आणि सहजाकडे नेतृत्व

108
Indian tennis player in action during a match.
India's Asian Games 2026 : आशियाई खेळांसाठी भारताचा टेनिस संघ जाहीर; सुमित आणि सहजाकडे नेतृत्व

India’s Asian Games 2026               अखिल भारतीय टेनिस संघटनेने जपानमध्ये होणाऱ्या २०व्या आशियाई खेळांसाठी भारतीय टेनिस संघाची घोषणा केली आहे. पुरुष गटातील भारताचा अव्वल एकेरी टेनिसपटू सुमित नागल आणि महिला गटातील अव्वल टेनिसपटू सहजा यमलपल्ली भारतीय संघाचे नेतृत्व करतील. अध्यक्ष नंदन बल यांच्या नेतृत्वाखालील AITA निवड समितीने पुरुष आणि महिला गटांसाठी प्रत्येकी सहा टेनिसपटूंचा संघ निवडला आहे. आशियाई खेळांमध्ये भारताची दमदार कामगिरी सुनिश्चित करण्यासाठी या संघात अनुभवी खेळाडूंसोबतच तरुण प्रतिभावान टेनिसपटूंचाही समावेश आहे. (India’s Asian Games 2026)

(हेही वाचा – Petrol Diesel Price Today : देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग; वाचा तुमच्या शहरातील नवे दर काय?)

भारतीय पुरुष संघात एकेरी गटासाठी सुमित नागल (जागतिक क्रमवारी २७७), मानस धामणे (३७८) आणि दक्षिणेश्वर सुरेश (४७८) यांची निवड झाली आहे. दुहेरीतील विशेषज्ञ युकी भांब्री (जागतिक क्रमवारी २४), एन. श्रीराम बालाजी (६१) आणि अनिरुद्ध चंद्रशेखर (९०) यांची संघात निवड झाली आहे. राखीव टेनिसपटूंमध्ये करण सिंग, ऋत्विक बोलिपल्ली आणि निकी कालियांडा पूनाचा यांचा समावेश आहे. (India’s Asian Games 2026)

(हेही वाचा – Cabinet Decision : नागपुरात हाय-टेक प्रकल्प तर ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याची नवी दिशा; मंत्रिमंडळाचे महत्त्वपूर्ण निर्णय जाणून घ्या)

महिलांच्या गटात, भारताची अव्वल टेनिसपटू सहजा यमलापल्ली (जागतिक क्रमवारी ३३२), तसेच वैष्णवी अडणकर (३९६) आणि वैदेही चौधरी (४१७) यांची एकेरीसाठी निवड झाली आहे. दुहेरीच्या संघात ऋतुजा भोसले (१२५), प्रार्थना थोंबरे (१८१) आणि अंकिता रैना (१८५) यांचा समावेश आहे. राखीव टेनिसपटूंमध्ये जिल देसाई आणि श्रुती अहलावत यांचा समावेश आहे.२० वे आशियाई खेळ ‘आशियाई खेळ २०२६’ या नावाने १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जपानमधील आयची आणि नागोया येथे आयोजित केले जातील. भारतीय टेनिस संघटनेने निवड झालेल्या टेनिसपटूंना शुभेच्छा दिल्या असून त्यांच्या तयारीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. (India’s Asian Games 2026)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.