MSRTC Fare Hike Extended : लालपरीचा प्रवास महागच राहणार; महामंडळाकडून १० टक्के भाडेवाढीला मुदतवाढ

124
MSRTC Fare Hike Extended : लालपरीचा प्रवास महागच राहणार; महामंडळाकडून १० टक्के भाडेवाढीला मुदतवाढ
MSRTC Fare Hike Extended : लालपरीचा प्रवास महागच राहणार; महामंडळाकडून १० टक्के भाडेवाढीला मुदतवाढ

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमधून (ST Bus) प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. प्रशासनाने साध्या आणि मध्यम आकाराच्या बसेससाठी लागू केलेल्या १० टक्के हंगामी भाडेवाढीची (seasonal fare hike) मुदत आणखी एका महिन्यासाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन नियमानुसार, संपूर्ण राज्यातील प्रवाशांना येत्या १५ जुलै २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत वाढीव तिकीट दरानेच प्रवास करावा लागणार आहे. सुरुवातीला ही तात्पुरती वाढ जून महिन्यापर्यंतच मर्यादित होती, परंतु आता ती पुढे ढकलण्यात आली आहे.  (MSRTC Fare Hike Extended)

(हेही वाचा – Pune Water Shortage : पुण्यात कधी येणार पाणी? सम-विषम तारखेनुसार पाणी कपातीचे नवे वेळापत्रक जारी  )

उन्हाळी गर्दीच्या हंगामात महामंडळाच्या महसुलात वाढ करण्याच्या उद्देशाने एसटी प्रशासनाने १५ एप्रिल २०२६ पासून साध्या बससेवांच्या भाड्यात १० टक्के हंगामी वाढ लागू केली होती. या निर्णयानुसार वाढीव भाडेदरांची मुदत १५ जूनला संपुष्टात येणार होती. मात्र, इंधनाच्या वाढत्या किमती आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झालेली वाढ यामुळे महामंडळाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर भाडेवाढ कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महामंडळाने दिली. (MSRTC Fare Hike Extended)

एसटीला एप्रिलमध्ये ७६ कोटींचा तोटा 

महामंडळाच्या आर्थिक स्थितीबाबत एप्रिल २०२६ ची आकडेवारी चिंताजनक चित्र समोर आणणारी ठरली आहे. प्रवाशांवर १० टक्के हंगामी भाडेवाढीचा अतिरिक्त भार टाकूनही एसटी महामंडळाला तब्बल ७६ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता.

(हेही वाचा – CNG Price Hike : वाहन चालकांना झटका! सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ; मध्यरात्रीपासून नवे दर लागू)

विशेष म्हणजे, मागील वर्षी एप्रिल २०२५ मध्ये कोणतीही हंगामी भाडेवाढ लागू नसताना महामंडळाने १४ कोटी रुपयांचा नफा मिळवला होता. भाडेवाढ नियमित ठेवल्याने शालेय विद्यार्थी आणि इतर प्रवासी माध्यमातून अपेक्षित असलेली महसूल वाढ होणार नाही, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.