
-
प्रतिनिधी
Eknath Shinde ठाणे महापालिका शाळा क्रमांक २३ मधील तो जुना बाक आणि तिथून सुरू झालेला एक प्रवास… आज त्याच शाळेच्या प्रवेशोत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा विद्यार्थ्यांसमोर उभे राहिले, तेव्हा केवळ एक मंत्री नाही, तर त्यांच्यातील ‘माजी विद्यार्थी’ जिवंत झाला होता. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या शालेय जीवनातील संघर्ष आणि त्यातून मिळालेल्या यशाचा कानमंत्र देत त्यांनी विद्यार्थ्यांना स्वप्न पाहण्याचे आणि ते पूर्ण करण्यासाठी जिद्दीने पेटून उठण्याचे आवाहन केले. (Eknath Shinde)
शिक्षण म्हणजे केवळ पदव्या मिळवणे नव्हे, तर एक सुजाण नागरिक घडवण्याची प्रक्रिया असल्याचे सांगत, त्यांनी राज्यातील शाळांमध्ये होत असलेल्या बदलांचा आढावा घेतला. आजच्या विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा मिळत असल्या तरी, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ‘सुविधांपेक्षा जिद्द आणि मेहनतीचे’ महत्त्व जास्त असल्याचे त्यांनी आपल्या उदाहरणातून पटवून दिले. शाळेच्या नावापेक्षा शिक्षकांची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांची जिज्ञासू वृत्ती हेच यशाचे गमक असल्याचे सांगत, त्यांनी न्यूनगंड बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. (Eknath Shinde)
(हेही वाचा – Konkan Railway वरील २६३ किमी मार्गाचे होणार दुपदरीकरण)
मोबाईलच्या विळख्यात अडकलेल्या पिढीला मैदानी खेळांचे महत्त्व पटवून देताना त्यांनी, “प्रश्न विचारणारा विद्यार्थीच खऱ्या अर्थाने हुशार असतो,” असा मोलाचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी आपल्या जुन्या गुरुजनांची आठवण काढत शिक्षकांच्या योगदानाचे भरभरून कौतुक केले. (Eknath Shinde)
”उडान भरनी हो तो परों को मजबूत करो…” या ओळींमधून त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले. तसेच, ठाणे महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आवश्यक असणारा निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही देत, शाळांच्या मूलभूत सुविधांची वेळोवेळी तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. एक सामान्य विद्यार्थी ते राज्याचा उपमुख्यमंत्री असा प्रवास केलेल्या नेत्याचे हे प्रेरणादायी भाषण उपस्थित विद्यार्थी आणि पालकांसाठी एका नव्या ऊर्जेचा स्रोत ठरले. (Eknath Shinde)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
