Dombivli च्या खंबाळपाड्यात धक्कादायक घटना; घर बांधण्याच्या वादातून शेजाऱ्याची हत्या

घटनास्थळी तणावाचे वातावरण; टिळकनगर पोलिसांकडून तपास चक्रांना वेग

94
धक्कादायक हत्या प्रकरणातील प्रताप चौधरीचा फोटो
Dombivli च्या खंबाळपाड्यात धक्कादायक घटना; घर बांधण्याच्या वादातून शेजाऱ्याची हत्या
  • कल्याण, प्रतिनिधी

Dombivli              डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. घर बांधण्याच्या वादातून शेजाऱ्यानेच शेजाऱ्याची हत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रताप चौधरी याचा जागीच मृत्यू झाला. तर हत्येनंतर मारेकरी रोहित शेलार फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना झाली आहेत. (Dombivli)

(हेही वाचा – Dombivli च्या निवासी विभागात स्वयंपुनर्विकासाचा केंद्रबिंदू; मनसे नेते राजू पाटील यांनी सुचवला पर्याय)

प्राथमिक माहितीनुसार, खंबाळपाडा येथे राहणाऱ्या चौधरी आणि शेलार या दोन कुटुंबांमध्ये घराच्या बांधकामावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. मंगळवारी हा वाद विकोपाला गेला आणि रोहित शेलार याने प्रताप चौधरी याच्यावर शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रतापचा जागीच मृत्यू झाला. हे पाहून मारेकरी रोहित शेलार याने घटनास्थळावरून पळ काढला. (Dombivli)

(हेही वाचा – Dombivli मध्ये आराधना अकादमीतर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य कथक नृत्य प्रशिक्षण वर्ग सुरू)

या घटनेची माहिती मिळताच टिळकनगर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. खुन्याला पकडण्यासाठी टिळकनगर पोलिसांची पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान या घटनेनंतर खंबाळपाडा परिसरात तणावाचे वातावरण असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या या हत्येमुळे स्थानिक रहिवासी पुरते हादरले आहेत. (Dombivli)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.