Kalyan-Shil Highway वर खळबळ! भरधाव ट्रकच्या धडकेत रिजन्सी अनंतम् चौकातील सिग्नल चक्काचूर, चालक पसार

89
Kalyan-Shil Highway चा विकास की नियोजनशून्यता? भूमिपुत्र धर्माभिमानी संघाचा प्रशासनाला खडा सवाल
  • कल्याण : प्रतिनिधी

कल्याण-शिळ महामार्गावरील (Kalyan-Shil Highway) डोंबिवली जवळ असलेल्या अत्यंत वर्दळीच्या रिजन्सी अनंतम् चौकात मंगळवारी पहाटेच्या एका भरधाव ट्रकने वाहतूक सिग्नलला जोरदार धडक दिली. या धडकेत सिग्नलचा संपूर्ण खांबच जमीनदोस्त होऊन चक्काचूर झाला. पहाटेची वेळ असल्याने सुदैवाने या दुर्घटनेत घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या चौकातील वाहतूक कोंडीची (Traffic jam) समस्या अधिकच गंभीर झाली. मात्र या चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रं-दिवस काम सुरू केले आहे.

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक थेट रिजन्सी अनंतम् चौकातील सिग्नलच्या खांबावर जाऊन आदळला. धडक इतकी जोरदार होती की सिग्नलचा लोखंडी खांब मुळासकट उखडून या सिग्नलचे दिवे फुटून रस्त्यावर पसरले. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला.

(हेही वाचा – Grapes : कॅलिफोर्निया पॅटर्न आता महाराष्ट्रातही? द्राक्ष उत्पादकांसाठी ‘हा’ मोठा निर्णय जारी)

रिजन्सी अनंतम् चौक हा कल्याण-शिळ महामार्गावरील (Kalyan-Shil Highway) सर्वात महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या चौकांपैकी एक आहे. कल्याण, डोंबिवली, तळोजा आणि पनवेलकडे जाणारी वाहतूक येथूनच जाते. सिग्नल बंद पडल्याने सकाळपासूनच येथे वाहतूक कोंडी झाली. वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांना मनुष्यबळ लावून वाहतूक नियंत्रित करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त ताण आला आहे. या घटनेची माहिती कळताच कल्याण वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह आणि केडीएमसीचे (KDMC) अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. महापालिकेच्या विद्युत विभागाला तातडीने नवीन सिग्नल बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तोपर्यंत वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. पळून गेलेल्या ट्रकच्या चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. मानपाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कल्याण-शिळ महामार्ग गेल्या काही वर्षांपासून अपघात आणि वाहतूक कोंडीसाठी चर्चेत आहे. अवजड वाहनांची सततची वर्दळ आणि बेशिस्त वाहतूक यामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सिग्नल यंत्रणा कोलमडल्याने प्रवाशांचे हाल अधिकच वाढले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.