Bandra east demolition: पत्रकार वेद कुमार यांनी समाजमाध्यमावर केलेल्या एका विस्तृत पोस्टमुळे मुंबईतील बेहरामपाडा, बांगलादेशी घुसखोरी, शिवसेना (ठाकरे), काँग्रेस आणि दत्त कुटुंबीय यांच्याशी संबंधित जुन्या घटनांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. १९८४ पासून ते २०२६ पर्यंतच्या राजकीय घटनांचा संदर्भ देत करण्यात आलेल्या या दाव्यांबाबत, समाजमाध्यमावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी या पोस्टला ऐतिहासिक आणि राजकीय वास्तवाशी जोडले आहे, तर काहींनी या दाव्यांची अधिकृत पडताळणी होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
पत्रकार वेद कुमार यांच्या पोस्टमधील मजकूर:
“1984: सुनील दत्त पहिल्यांदा खासदार बनले. सुनील दत्त यांनी बांगलादेशी घुसखोर मुसलमान मुंबईत आणले आणि त्याच्या लोकसभा मतदारसंघात सेटल केले. अख्खा बेहरामपाडा बांग्लादेशींनी भरला. मातोश्रीपासून जेमतेम 500 मीटर अंतरावर ही वस्ती उभी राहिली, पण कोणत्याही प्रकारचा प्रतिकार शिवसेनेने केला नाही. 1984 मध्ये राजीव गांधी पंतप्रधान झाले होते, त्यांच्या पर्सनल देखरेखीखाली ही ‘मिशन’ पार पडली होती. गांधी घराण्याच्या शब्दापुढे ठाकरे कधीच नव्हते.
उलट बीएमसीकडून सगळ्या सोयी करण्यात आल्या. देशात, राज्यात आणि मुंबईत सत्तेवर कोण होतं आणि मुंबईवर राज कोणाचे होते हे सगळ्यांना ठाऊक आहे.
12 मार्च 1993 : मुंबईत 12 बॉम्बब्लास्ट झाले.
19 एप्रिल 1993 : त्या केसमध्ये संजय दत्त याला अटक झाली. त्याच्याकडून AK-56 जप्त करण्यात आली. टाडाखाली त्याला अटक करण्यात आली. यात जामीन मिळविणे जवळपास अशक्य होते.
24-25 एप्रिल 1993 : सुनील दत्त बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला गेले. संजय दत्त याला जामीन मिळणार असेल तर बाळासाहेब ठाकरे यांनी ‘सहकार्याची भूमिका’ घ्यावी अशी विनंती त्यांनी केली.
5 मे 1993 : संजय दत्तला जामीन मिळाला. जामीन मिळून बाहेर येताच, सुनील दत्त त्याला मातोश्रीवर पाया पडायला घेऊन गेले. संजय दत्त प्रकरणात घेतलेल्या सहकार्याच्या भूमिकेच्या बदल्यात सुनील दत्त यांना निवडणूक न लढविण्याचा ‘आदेश’ बाळासाहेबांनी दिला. ‘मातोश्री’ ज्या मतदारसंघात होते, तो मतदारसंघ शिवसेना कधीच जिंकली नव्हती.
16 मे 1996 : मातोश्रीवरील आदेश शिरसावंद्य मानून सुनील दत्त यांनी निवडणूक लढवली नाही आणि सेनेच्या उमेदवाराला अप्रत्यक्ष मदतही केली. मधुकर सरपोतदार खासदार बनले.
बीएमसी जोपर्यंत ठाकरेंच्या ताब्यात होती तोपर्यंत या घुसखोरांची तिसरी पिढी मतदार झाली. फक्त बीएमसी कडून सुखसोयी आणि पाणी नाही, तर या सगळ्यांकडे ‘आधार’ पासून ‘उधार’ सगळ्या प्रकारची कार्ड आली. हे सगळे सरकारी योजनांचे लाभार्थी झाले.
मातोश्री-1 नंतर मातोश्री-2 बंगला पण उभा राहिला, तोही बेहरामपाडा पासून केवळ 300 मीटर अंतरावर. पण बेहरामपाड्यावर मात्र कारवाई नाहीच! ही अघोषित, अभद्र युती पुढेही सुरूच राहिली.
15 जानेवारी 2026 : बीएमसी मधून मुंबईकरांनी शिवसेनेला हाकलून दिले.
शेवटी आजचा दिवस उजाडला. ना राज्य सरकार मध्ये उध्दवची सेना ना ओरिजिनल सेनेला जन्माला घालणारी काँगेस आणि बीएमसी मध्ये पण ठाकरे नाहीत. राज्य सरकार मध्ये काँग्रेस किंवा बीएमसी मध्ये आज ठाकरे असते तर ही बेहरामपाडामधील कारवाई शक्य नव्हती. ‘ट्रिपल इंजिन’ किती आवश्यक आहे बघा. ‘त्यांचे’ ट्रिपल इंजिन सरकार होते 1984 मध्ये, तर बेहरामपाडा उभा राहिला. आज रेल्वे (केंद्र सरकार), पोलिस (राज्य सरकार) आणि बीएमसी तिन्ही ठिकाणी भाजपचे ट्रिपल इंजिन सरकार आहे, तर बेहरामपाड्याला बांगलादेशी-मुक्त करण्यात येत आहे! EVM वर योग्य बटन दाबणाऱ्या मुंबईकरांचे धन्यवाद आणि अभिनंदन. “
वेल-डन बीजेपी!🌷
जय श्रीराम!🚩
– वेद कुमार.
हेही पाहा:
Join Our WhatsApp Community


