Maharashtra Investment : महाराष्ट्रात उर्जा क्षेत्रात तब्बल ६.५ लाख कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक

114
Maharashtra Investment : महाराष्ट्रात उर्जा क्षेत्रात तब्बल ६.५ लाख कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक
Maharashtra Investment : महाराष्ट्रात उर्जा क्षेत्रात तब्बल ६.५ लाख कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक
  • विशेष प्रतिनिधी

​Maharashtra Investment : भारताला शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट गाठून देऊन देशाला एक ‘संपन्न ऊर्जा राष्ट्र’ बनवण्यासाठी महाराष्ट्राने आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल उचलले आहे. राज्यात तब्बल ६ लाख ५० हजार कोटी रुपयांची महागुंतवणूक आणणाऱ्या एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या अभूतपूर्व प्रकल्पामुळे राज्यात २५ हजार ४०० मेगावॅट इतकी अफाट अणुऊर्जा निर्माण होणार असून, तब्बल १ लाख २३ हजार ५०० तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. मंत्रालयात आयोजित एका विशेष बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत या करारांचे आदान-प्रदान करण्यात आले. (Maharashtra Investment)

​या महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी देशातील चार आघाडीच्या बड्या कॉर्पोरेट कंपन्यांनी महाराष्ट्रासोबत हातमिळवणी केली आहे. यामध्ये NTPCL (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड), अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाची ललितपुर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात ऊर्जेचे नवे पर्व सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना विश्वास व्यक्त केला की, स्वच्छ ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात होणारी ही गुंतवणूक देशाला जागतिक पातळीवर मजबूत करेल. तसेच राज्यात गुंतवणूक करणाऱ्या या कंपन्यांना शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. (Maharashtra Investment)

(हेही वाचा – दिल्ली उच्च न्यायालयाची अवमान प्रकरणात Arvind Kejriwal आणि इतर सहा आरोपींना नोटीस)

​या महाकरारा अंतर्गत होणाऱ्या गुंतवणुकीचे गणित अत्यंत थक्क करणारे आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज सर्वाधिक २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यातून ७,२०0 मेगावॅट ऊर्जा आणि सर्वाधिक म्हणजे तब्बल १ लाखाच्या वर रोजगार निर्माण होणार आहेत. त्यापाठोपाठ बजाज समूहाची ललितपुर पॉवर जनरेशन कंपनी २ लाख कोटींच्या गुंतवणुकीतून ५ हजार मेगावॅट ऊर्जा निर्माण करेल. अदानी पॉवर लिमिटेड १ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक करून ६ हजार मेगावॅट ऊर्जा आणि १२ हजार रोजगार निर्माण करणार आहे, तर सरकारी क्षेत्रातील एनटीपीसी लिमिटेड १ लाख कोटींची गुंतवणूक करून ७,२०० मेगावॅट ऊर्जेसह ५ हजार रोजगारांची भर घालणार आहे. (Maharashtra Investment)

​पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पर्यावरणपूरक आणि स्वच्छ ऊर्जा निर्मितीच्या स्वप्नाला बळ देण्यात महाराष्ट्र हा नेहमीच देशात अग्रेसर राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या ऊर्जा प्रकल्पांमुळे केवळ विजेचा प्रश्न सुटणार नाही, तर राज्याच्या आर्थिक विकासालाही प्रचंड वेग येईल. संबंधित कंपन्यांनी आता प्रकल्पाच्या जागांचे सर्वेक्षण करून प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरुवात करावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले असून, राज्य शासनाचे (State government) विविध विभाग या कामी कंपन्यांना संपूर्ण तांत्रिक आणि प्रशासकीय सहकार्य करणार आहेत. (Maharashtra Investment)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.