Transfers : गृह विभागाचा मोठा निर्णय; महाराष्ट्रात ६२ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नती

130
Transfer : अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिवपदी डॉ. माधवी खोडे-चावरे यांची नियुक्ती
  • प्रतिनिधी

Transfers            महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. ‘अपर पोलीस महासंचालक’ आणि ‘विशेष पोलीस महानिरीक्षक’ आणि पोलीस उपायुक्त श्रेणीतील एकूण ६२ वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने व बदलीने नवीन पदस्थापना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदींनुसार सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने हा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. या बदल्यांमध्ये मुंबई, पुणे, नाशिक आणि कोकण यांसह अनेक महत्त्वाच्या विभागांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मुंबई पोलीस दलातील सहपोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी (कायदा व सुव्यवस्था) यांची पोलीस सह आयुक्त (वाहतूक), मुंबई पदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांची वर्णी लागली आहे. मनोज शर्मा यांच्यावर नुकताच ‘बारावी फेल’ हा चित्रपट काढण्यात आला होता, या चित्रपटामुळे मनोज शर्मा हे घराघरात पोहचले आहे. (Transfers)

मुंबई पोलिस दलातील आणखी एक महत्त्वाचे पद म्हणजे गुन्हे शाखा हे आहे, गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य, येथे बदली करण्यात आली आहे. लखमी गौतम यांच्या जागी मुंबई वाहतूक विभागाचे सहपोलीस उपायुक्त अनिल कुंभारे यांची मुंबई गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी बदली करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) सुवेझ हक यांच्याकडे मुंबई पोलिस दलाचे पोलीस सह आयुक्त (प्रशासन), मुंबई पदी बदली. कृष्ण प्रकाश अपर पोलीस महासंचालक (फोर्स वन) वरून अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण), लखमी गौतम पोलीस सह आयुक्त (गुन्हे), मुंबई वरून विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य, मुंबई पदी बदली. मनोज शर्मा विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य वरून पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), मुंबईपदी बदली, अनिल कुंभारे पोलीस सह आयुक्त (वाहतूक), मुंबई वरून **पोलीस सह आयुक्त (गुन्हे), मुंबई या अत्यंत महत्त्वाच्या पदी नियुक्ती, सत्य नारायण चौधरी पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), मुंबई वरून पोलीस सह आयुक्त (वाहतूक), मुंबई पदी बदली. (Transfers)

(हेही वाचा – Amravati: अमरावती पोलिसांच्या “एअर कूल्ड जॅकेटची” सर्वत्र चर्चा; कशी आहे या जॅकेटची प्रणाली?)

पदोन्नती मिळालेले अधिकारी –

महेश पाटील अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग, मुंबई) यांना विशेष पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय), महाराष्ट्र राज्य पदी पदोन्नती देण्यात आली आहे.परमजीत दहिया अपर पोलीस आयुक्त (मुंबई) यांना विशेष पोलीस महानिरीक्षक (दहशतवाद विरोधी पथक – ATS) पदी पदोन्नती मिळाली आहे.दिपक साकोरे अपर पोलीस आयुक्त (नवी मुंबई) यांना पोलीस सह आयुक्त (नवी मुंबई) पदी पदोन्नती देण्यात आली आहे. ज्योती प्रिया सिंग पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या ज्योती प्रिया सिंग यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (अमली पदार्थ विरोधी पथक – Anti Narcotics Cell) पदी पदोन्नतीसह नियुक्ती करण्यात आली आहे. (Transfers)

इतर महत्त्वाच्या फेरबदल्या :

दत्ता कराळे : विशेष पोलीस महानिरीक्षक (नाशिक परिक्षेत्र) वरून विशेष पोलीस महानिरीक्षक (राज्य मानवी हक्क आयोग)
प्रविण पडवळ : विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण) वरून विशेष पोलीस महानिरीक्षक (नाशिक परिक्षेत्र)
सी.के. मीना : विशेष पोलीस महानिरीक्षक (ATS) वरून विशेष पोलीस महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र)
संजय दराडे : विशेष पोलीस महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र) वरून पोलीस सह आयुक्त (पुणे)
रंजन शर्मा : पोलीस सह आयुक्त (पुणे) वरून विशेष पोलीस महानिरीक्षक (कोल्हापूर परिक्षेत्र)
सुनिल फुलारी : विशेष पोलीस महानिरीक्षक (कोल्हापूर परिक्षेत्र) वरून विशेष पोलीस महानिरीक्षक (गुन्हे अन्वेषण विभाग – CID, पूर्व)
राजेश प्रधान : पदस्थापनेच्या प्रतीक्षेतून पोलीस सह आयुक्त (आर्थिक गुन्हे – EOW), मुंबई पदी नियुक्ती.
निशिथ मिश्रा : पोलीस सह आयुक्त (आर्थिक गुन्हे, मुंबई) वरून विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण)
संजय येनपुरे : पोलीस सह आयुक्त (नवी मुंबई) वरून विशेष पोलीस महानिरीक्षक (व्ही.आय.पी. सुरक्षा)
एस. व्ही. पाठक : अपर पोलीस आयुक्त (प्रशासन, ठाणे) वरून विशेष पोलीस महानिरीक्षक (आर्थिक गुन्हे), गुन्हे अन्वेषण विभाग (CID), पुणे
संजय जाधव : अपर पोलीस आयुक्त (ठाणे) यांना त्याच पदावर In Situ’ पदोन्नती देण्यात आली आहे.
जय कुमार, पंजाबराव उगले आणि विनायक देशमुख या अधिकाऱ्यांची नवीन पदांवर नियुक्ती करताना पद अवनत (Downgrade) करून पदस्थापना देण्यात आली आहे. (Transfers)

(हेही वाचा – NCP : पुण्याच्या ‘त्या’ गुप्त बैठकीने महाराष्ट्राचे राजकारण ढवळणार? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग!)

१० वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढतीसह बदल्या

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी राज्यातील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल केले आहेत. ‘पोलीस उप महानिरीक्षक’ (DIG) आणि ‘अपर पोलीस आयुक्त’ (Addl. CP) श्रेणीतील एकूण १० वरिष्ठ भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने आणि बदलीने नवीन पदस्थापना करण्यात आल्या आहेत. या आदेशानुसार अनेक अधिकाऱ्यांना पोलीस उप महानिरीक्षक (DIG) आणि अपर पोलीस आयुक्त पदी पदोन्नती (Promotion) देण्यात आली आहे . (Transfers)

बदली व पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आणि नवीन पदस्थापना :

मोक्षदा पाटील पोलीस उप महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल (SRPF), मुंबई ते अपर पोलीस आयुक्त, मुंबई
प्रियंका नारनवरे अपर पोलीस आयुक्त, वाहतुक, मुंबई ते पोलीस उप महानिरीक्षक तथा मुख्य दक्षता अधिकारी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC), मुंबई
तेजस्वी सातपुते समादेशक, राज्य राखीव पोलीस बल (SRPF), गट क्र.१, पुणे ते अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पुणे शहर (पदोन्नतीने)
अशोक दुधे उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग (SID), मुंबई ते पोलीस उप महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल (SRPF), मुंबई (पदोन्नतीने)
दिक्षीत गेडाम पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई ते अपर पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई (पदोन्नतीने)
कृष्णकांत उपाध्याय पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई ते अपर पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई (पदोन्नतीने)
प्रविण मुंढे पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई ते अपर पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई (पदोन्नतीने)
योगेश गुप्ता पोलीस अधीक्षक (प्रभारी DIG, गडचिरोली) ते पोलीस उप महानिरीक्षक, गडचिरोली (पदोन्नतीने)
राकेश ओला पोलीस अधीक्षक (प्रभारी DIG, अमरावती) | पोलीस आयुक्त, अमरावती कमी (पदोन्नतीने)
एम.सी.व्ही.महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग (CID), पुणे ते पोलीस उप महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग (CID), पुणे (पदोन्नतीने)
महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) मधील कलम २२न मधील तरतुदींनुसार हे आदेश तातडीने लागू करण्यात आले आहेत . मुंबई, पुणे, गडचिरोली आणि अमरावती या महत्त्वाच्या शहरांमधील आणि विभागांमधील कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी हे प्रशासकीय फेरबदल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. (Transfers)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.