Mumbai Water Shortage : ‘तहान’ भागवणं कठीण? पालिकेकडून १० टक्के पाणी कपातीची घोषणा; ‘हे’ आहे मुख्य कारण

86
Water Shortage
Water Shortage

मुंबईसह (Mumbai) आपपासच्या भागात अतिउष्णतेमुळे येत्या काही दिवसांत पाणीटंचाई (water Shortage) होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिका (BMC) शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाण्याची पातळी मोठ्या प्रमणात घटल्याने, मुंबई महानगरपालिकेने १५ मे पासून १० टक्के पाणी कपातीची घोषणा केली आहे. अधिकाऱ्यांनी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करणारी सूचनाही प्रसिद्ध केली आहे. मुंबई महानगर पालिकेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या मते, अधिक काळासाठी पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. एल निनो आणि हिंद महासागर द्विध्रुव (आयओडी) परिस्थितीमुळे सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने, हे पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे पालिकेने म्हटले आहे. (Mumbai Water Shortage)

(हेही वाचा – PM Modi Gold Appeal: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर, सराफा बाजारात काय आहे नेमकी परिस्थिती?)

मुंबई महानगरपालिकेने ११ मे ला प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या ३,४०,३९९ दशलक्ष लिटर पिण्यायोग्य पाणी आहे. हे प्रमाण १४,४७,३६३ दशलक्ष लिटरच्या एकूण वार्षिक गरजेच्या केवळ २३.५२ टक्के आहे.  (Mumbai Water Shortage)

सध्या कोणत्या भागांमध्ये पाणीपुरवठा खंडित झाला आहे?
८ मे ला, मुंबईतील महालक्ष्मीजवळ भूमिगत पाईपलाईनला (Underground pipeline) मोठी गळती लागल्याने दक्षिण आणि मध्य मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा खंडित झाला होता. प्रभावित परिसरांमध्ये लॅमिंग्टन रोड, ग्रँट रोड ईस्ट, ताडदेव, कामाठीपुरा आणि जी दक्षिण वॉर्डच्या काही भागांचा समावेश आहे. पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका तातडीच्या दुरुस्तीचे काम करत आहे.

(हेही वाचा – सनातनचा नाश व्हायला हवा; Udhayanidhi Stalin पुन्हा बरळले, पराभवानंतरही हिंदूविरोध कायम)

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, पाणीपुरवठा नियोजनाचा (Water supply planning) दररोज आढावा घेतला जात आहे. महापालिकेने असेही म्हटले आहे की, घाबरण्याची गरज नाही, कारण गरज भासल्यास भातसा आणि अप्पर वैतरणा धरणांमधून अतिरिक्त राखीव पाणी घेतले जाईल. १० टक्के पाणी कपातीचा परिणाम ठाणे आणि भिवंडी-निझामपूर महानगरपालिकांसारख्या जवळच्या भागांतील पाणीपुरवठ्यावरही होईल. तसेच पावसाळ्यानंतर पाणीसाठ्यात सुधारणा होईपर्यंत हे निर्बंध कायम राहतील.

(हेही वाचा – Pune Municipal Corporation: कचरा निविदा प्रक्रिया पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, कोट्यवधींचे नुकसान होण्याची भीती)

दरम्यान, नागरिकांना पाणी वाचवण्याच्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेने लोकांना पाण्याचा अपव्यय टाळणे, गळणारे नळ दुरुस्त करणे, शॉवरऐवजी बादलीने अंघोळ करणे आणि वाहने धुण्यासाठी प्रेशर पाण्याचा वापर टाळणे असा सल्ला दिला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.