BJP on Sanjay Raut : ‘पत्रा चाळी’चा हिशोब अन् बिल्डरांचा गेम ओव्हर! भाजपाचे संजय राऊतांवर टीकास्त्र

79
​BJP on Sanjay Raut : 'संजय राऊत' की 'संजय दाऊद'? भाजपाचा घणाघात; राजकारण तापले
  • प्रतिनिधी

BJP on Sanjay Raut                  ​मिरा-भाईंदरमधील ६ हजार कोटींच्या जमिनीवरून सुरू झालेल्या राजकीय युद्धात आता भाजपाने आक्रमक पवित्रा घेत विरोधकांना थेट इशारा दिला आहे. “मिरा-भाईंदरमधील सरकारी जमिनीचा एक इंच तुकडाही बिल्डरांच्या घशात जाऊ दिला जाणार नाही. हे काही बिल्डरांचे हित जपणारे महाविकास आघाडीचे किंवा उद्धव ठाकरेंचे सरकार नाही,” अशा शब्दांत भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत आणि काँग्रेसच्या आरोपांची तोफ डागली. (BJP on Sanjay Raut)

​शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना नवनाथ बन यांनी स्पष्ट केले की, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधीच या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भूमिका जाहीर केली आहे. सरकार न्यायालयात पूर्ण ताकदीने लढेल आणि सरकारी जमीन वाचवेलच, पण ज्यांनी यात गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला, त्यांची रवानगी पत्रा चाळ घोटाळ्यातील आरोपींप्रमाणे तुरुंगात केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. (BJP on Sanjay Raut)

(हेही वाचा – S.S.C. Result: दहावीच्या निकालानंतर ३ विद्यार्थिनींनी केली आत्महत्या; कमी गुण, नापास होण्याच्या भीतीने उचललं टोकाचं पाऊल)

​संजय राऊतांच्या ‘दुटप्पी’ भूमिकेवर प्रहार 

न्यायालयाच्या निकालावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या संजय राऊतांवर टीका करताना बन म्हणाले की, “न्यायालयाचा निकाल बाजूने लागला की तो न्याय आणि विरोधात गेला की न्यायालयावरच संशय घ्यायचा, हा राऊतांचा ढोंगीपणा आहे. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारी आणि दररोज १०० कोटींची वसुली करणारी तुमची परंपरा होती. वाझेसारख्या गुन्हेगाराचे समर्थन करणाऱ्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये.” (BJP on Sanjay Raut)

(हेही वाचा – TVK : …तर तामिळनाडूत राष्ट्रपती राजवट लागू होईल)

​’इंडि’ आघाडीच्या फुटीवर भाष्य 

राज्यातील जमीन वादासोबतच नवनाथ बन यांनी ​’इंडि’ आघाडीतील अंतर्गत वादावरही बोट ठेवले. “राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्या नेतृत्वाखालील आघाडीत आता खंजीर खुपसण्याचे राजकारण सुरू झाले आहे. तामिळनाडूत द्रमुकच्या पाठीत काँग्रेसने खंजीर खुपसला असून, उद्धव ठाकरेंच्या बाबतीतही हेच घडणार आहे,” असा दावा त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या काँग्रेससोबत जाण्यापेक्षा दुकान बंद करण्याचे सांगितले होते, त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या शिवसेना उबाठाला लवकरच कुलूप लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला. मिरा-भाईंदरच्या जमिनीवरून सुरू झालेला हा वाद आता थेट न्यायालयीन लढाईसोबतच वैयक्तिक आरोपांच्या पातळीवर पोहोचल्याने राजकारण तापले आहे. (BJP on Sanjay Raut)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.