Mumbai Crime : प्रेमप्रकरणातून तरुणाचे अपहरण करून हत्येची भीती; शिवाजीनगर परिसरात खळबळ

76
Crime : ड्रग्ज माफियांकडून तक्रारदाराच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला
  • प्रतिनिधी 

Mumbai Crime               मुंबईतील शिवाजीनगर परिसरातून २७ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या भावाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. एका कथित प्रेमप्रकरणातून हा टोकाचा वाद निर्माण झाल्याचे सांगण्यात येत असून, याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (Mumbai Crime)

मुंबई सेंट्रल परिसरात राहणारे तक्रारदार गुराब्बीर रागीरुद्दीन शेख (३७) यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. त्यांचा धाकटा भाऊ औरंगजेब समीरुद्दीन शेख (२७) हा गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. विशेष म्हणजे, त्याचा मोबाईल फोनही बंद असल्याने कुटुंबीयांच्या काळजीत भर पडली आहे. (Mumbai Crime)

(हेही वाचा – Biscuit prices : आता बिस्किटांसाठी मोजावे लागणार जास्त पैसे, देशातल्या सर्वात मोठ्या कंपनीने सांगितले दरवाढीचे कारण…)

गुराब्बीर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, औरंगजेबचे त्याच्या मोठ्या भावाच्या (वसीम) पत्नीशी, म्हणजेच वहिनीशी (सिम्मी शेख) प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याच कारणावरून सिम्मीचा भाऊ आवेश आणि औरंगजेब यांच्यात गेल्या काही काळापासून वाद सुरू होता. सध्या वसीम आणि त्याची पत्नी सिम्मी हे बिहारमधील त्यांच्या मूळ गावी आहेत. (Mumbai Crime)

तक्रारीत नमूद केल्यानुसार, ५ मे रोजी वसीमने गावाहून फोन करून माहिती दिली की, आवेशने औरंगजेबला कोणत्यातरी बहाण्याने सोबत नेले आहे. त्यानंतर काही वेळातच आवेशने फोन करून औरंगजेबला *’कापून फेकून दिले आहे’* अशी धक्कादायक कबुली दिल्याने कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. यापूर्वीही आवेशने औरंगजेबला जीवे मारण्याची धमकी दिली होती, मात्र औरंगजेबने त्याकडे दुर्लक्ष केले होते. (Mumbai Crime)

(हेही वाचा – Al-Qaeda चा मालीमध्ये भीषण हल्ला; महिलांनाही सोडले नाही, लहान मुलांचीही केली निर्दयी हत्या)

औरंगजेबच्या कुटुंबीयांनी त्याला शिवाजीनगर, मानखुर्द आणि नातेवाइकांकडे शोधले, मात्र तो कुठेही मिळून आला नाही. ४ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आवेश आणि त्याच्या साथीदारांनी औरंगजेबचे अपहरण केल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, याप्रकरणी पोलिसांनी माहिती दिली तर तुम्हा सर्वांनाही जीवे मारू, अशी धमकी आरोपींकडून दिली जात असल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. औरंगजेबचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नसून, पोलीस तांत्रिक तपासाच्या आधारे पुढील शोध घेत आहेत. (Mumbai Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.