Bharat Taxi अनेकजण रोज प्रवास करताना ओला, उबरचा वापर करतात. रोज ऑफिसला येता-जाताना ओला उबर बुक करतात. मात्र, आता केंद्र सरकारने (Central Govt) भारत टॅक्सी लाँच केली आहे. भारत टॅक्सीमुळे आता चालकांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य मिळणार आहे. खासगी अॅपवरील टॅक्सीला आता पर्याय मिळाला आहे. आता ‘भारत टॅक्सी’ मुंबईतदेखील सुरू झाली आहे. मुंबईतील या ‘भारत टॅक्सी’च्या सेवेला पियुष गोयल (piyush goyal) यांनी गुरुवारी (२३ एप्रिल) हिरवा कंदिल दिला.
भारत टॅक्सीमुळे भाड्यावर काम करणाऱ्या ऑटो आणि कॅब चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता चालकांना नोंदणी शुल्क भरावे लागत नाही. कांदिवली पश्चिम येथील कार्यक्रमात ५०० पेक्षा जास्त ऑटो आणि कॅब चालक, वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी आणि सहकारी संस्था सहभागी झाल्या होत्या.Piyush Goyal
भारत टॅक्सी हा प्रकल्प केंद्र सरकारने सुरू केला आहे. यामध्ये आता भाड्याचे सर्व पैसे चालकाला मिळणार आहेत. फेब्रुवारीपासून हा प्रकल्प सुरू झाला. त्याचे दिवसाला साधारणपणे २५ हजार प्रवासी आहेत. ही सेवा उबर, रॅपिडोसारख्या कंपन्यांनाही मागे टाकू शकते, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
- भारत टॅक्सीमध्ये चालकांना मिळणार फायदा
- कोणत्याही कमिशनशिवाय चालकांना मिळणार पूर्ण भाडे
- ५ लाखांपर्यंत विमा संरक्षण
- परवडणाऱ्या दरात कर्ज दिले जाणार
- मुद्रा कर्ज योजनांचा लाभ घेता येणार
भारत टॅक्सीमध्ये आतापर्यंत ५.१७ लाखांहून अधिक चालक रजिस्टर आहेत. ग्राहकांची संख्या ५० लाखांपेक्षा जास्त आहे. ही भारत टॅक्सी दिल्ली, गुजरात, चंदीगड, लखनऊ आणि आता मुंबईतेदेखील (Mumbai ) सुरु झाली आहे.
किती भाडे आकारणार?
भारत टॅक्सीचे भाडे हे तुम्ही कुठून कुठपर्यंत प्रवास करता यावर अवलंबून असणार आहे. पहिल्या ४ किलोमीटरसाठी ३० रुपये आकारले जाणार आहेत. त्यानंतर १२ किलोमीटरपर्यंत प्रति किमी २३ रुपये आकारले जाणार आहे. त्यानंतर १८ रुपये प्रति किलोमीटर अशा स्वरुपात पैसे आकारले जाणार आहे. तुमच्या टॅक्सीनुसार, प्रवासाच्या वेळेनुसार हे पैसे आकारले जाणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

