IPL 2026 : केकेआरच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर शाहरुखने केली फ्रँचाईजींच्या सीईओंशी गंभीर चर्चा, व्हिडिओ व्हायरल

कोलकात्यात पाऊस सुरू असताना ड्रेसिंग रुममध्ये ही चर्चा सुरू होती.

100
IPL 2026 : केकेआरच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर शाहरुखने केली फ्रँचाईजींच्या सीईओंशी गंभीर चर्चा, व्हिडिओ व्हायरल
IPL 2026 : केकेआरच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर शाहरुखने केली फ्रँचाईजींच्या सीईओंशी गंभीर चर्चा, व्हिडिओ व्हायरल
  • ऋजुता लुकतुके

आयपीएल २०२६ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाच्या खराब कामगिरीमुळे संघ मालक शाहरुख खान (Shah Rukh Khan) सोमवारी काळजीत दिसला. त्याने कोलकात्यातील सामन्यादरम्यान फ्रँचाईजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसुरबरोबर (Venky Mysore) गहन चर्चा केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोलकात्यातील घरच्या मैदानावर पंजाब किंग्जविरुद्ध खेळताना कोलकाताची सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली. ३.४ षटकांत संघाच्या २ बाद २५ धावा झाल्या असताना पावसामुळे सामना थांबवावा लागला. आणि त्या विश्रांतीच्या वेळी शाहरुख आणि म्हैसुर ही चर्चा करताना दिसले. (IPL 2026)

या पावसाच्या विश्रांतीदरम्यान कॅमेऱ्यांनी शाहरुख खान आणि वेंकी म्हैसुर यांच्यातील ही तीव्र चर्चा टिपली. शाहरुख खान काही मुद्दे मांडताना हातवारे करताना दिसला, तर म्हैसुर त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत मान हलवत होते. ही चर्चा नेमकी कशाबद्दल होती हे स्पष्ट झाले नसले तरी ती गंभीर स्वरूपाची असल्याचे दिसून आले. (IPL 2026)

(हेही वाचा – अंधेरी ते मीरा भाईंदर प्रवास आता जलद आणि सुखद; Mumbai Metro Line 9 चे होणार उद्घाटन)

केकेआरची हंगामातील सुरुवाती निराशाजनक आहे. संघाने पहिले दोन सामने गमावले असून तिसऱ्या सामन्यातही खराब प्रदर्शन दिसून आले. ढगाळ वातावरण असताना प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णयही तज्ज्ञांनी टीकेचा विषय बनवला. नाणेफेक जिंकूनही पहिली फलंदाजी घेण्याच्या रहाणेच्या निर्णयावर अश्विन, कुंबळे यांनी आश्चर्य व्यक्त केलं. (IPL 2026)

या सामन्यावेळी शाहरुख खान यांच्यासोबत त्याची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) आणि व्यवस्थापक पूजा ददलानी (Pooja Dadlani) उपस्थित होत्या. पावसामुळे खेळ थांबलेला असताना सुहाना खानही जवळून ही चर्चा पाहताना दिसली. दरम्यान, संघातील काही प्रमुख खेळाडू अनुपस्थित असल्यानेही केकेआरच्या अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संघ व्यवस्थापनावर दबाव वाढत असून, शाहरुख खान आणि वेंकी मैसूर यांच्यातील चर्चा ही संघाच्या सध्याच्या परिस्थितीशी संबंधित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (IPL 2026)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.