नागपूरमध्ये सुरू असलेल्या U-17 राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपला (Boxing Championships) रविवारी एक वेगळीच उंची मिळाली, जेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचा भव्य शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात होताच संपूर्ण वातावरण उत्साहाने भारून गेले आणि गडकरी यांनी स्टेजवरून खेळाडूंना दिलेल्या प्रेरणादायी संदेशाने स्पर्धकांमध्ये नवा जोश आला.

मान्यवरांची उपस्थिती
या शुभारंभ प्रसंगी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव प्रमोद कुमार, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष राहुल शेवाळे, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे वरीष्ठ उपाध्यक्ष रणजित सावरकर, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव राकेश तिवारी, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे कोषाध्यक्ष मिलन वैद्य यांच्यासह आशिष जयस्वाल, कृपाल तुमाने, दीपक सावंत, संजय निरुपम, मनीषा कायंदे, किरण पांडव, श्रीमती देवांग आणि अर्जुन अवॉर्ड विजेते गोपाल देवांग यांची उपस्थिती लाभली. (Boxing Championships)

यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, ‘खासदार चषकाच्या माध्यमातून आम्ही ६५ विविध खेळांना प्रोत्साहन देत आहोत. बॉक्सिंगसारखा दमदार खेळही त्यात महत्त्वाचा भाग आहे.’ त्यांच्या या वक्तव्याने खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. (Boxing Championships)
(हेही वाचा Boxing Competition : नागपूरमध्ये ‘अंडर-१७ राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धे’चे भव्य आयोजन)
स्टेजवरूनच दिला ‘पंच’
विशेष म्हणजे, गडकरी यांनी बॉक्सिंगचे ग्लोव्हज परिधान करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यांच्या या कृतीने आणि संदेशाने उपस्थित खेळाडू व प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला. देशभरातून आलेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत गडकरी म्हणाले, ‘ही स्पर्धा तुमच्यासाठी मोठं व्यासपीठ आहे. मेहनत करा आणि देशाचं नाव उज्ज्वल करा.’ (Boxing Championships)
या बॉक्सिंग स्पर्धेच्या (Boxing Championships) भव्य आयोजनामुळे नागपूर शहरात बॉक्सिंगचा उत्साह शिगेला पोहोचला असून, देशभरातील युवा बॉक्सर आता रिंगमध्ये आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
Join Our WhatsApp Community


