Pakistan News : अमेरिकेने आम्हाला टॉयलेट पेपरसारखे वापरले; पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत मोठं वक्तव्य

Pakistan News :           अमेरिकेने आम्हाला टॉयलेट पेपरसारखे वापरले आणि फेकून दिले, असे विधान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी संसदेत केले.(Pakistan News)

229
Pakistan's Defense Minister Khawaja Asif during a speech.
Khawaja Asif addresses the parliament on U.S. relations.

Pakistan News :           अमेरिकेने आम्हाला टॉयलेट पेपरसारखे वापरले आणि फेकून दिले, असे विधान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी संसदेत केले.(Pakistan News) पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तालिबानचा उल्लेख करत राष्ट्रीय विधानसभेत अमेरिकेवर टीका केली. ते म्हणाले, पाकिस्तानने इस्लामचे रक्षण करण्यासाठी अफगाणिस्तानच्या भूमीवर झालेल्या दोन्ही युद्धांमध्ये भाग घेतला नाही. जिहादच्या नावाखाली अफगाणिस्तानविरुद्धच्या युद्धात त्यांचे लोक मारले गेले, तरीही पाकिस्तानने त्यातून काही शिकले नाही, अशी कबुली संरक्षणमंत्री आसिफ यांनी यावेळी दिली.(Pakistan News)

(हेही वाचा Dombivli Student Death : बारावीच्या विद्यार्थ्याचा लोकलमधून पडून मृत्यू; परीक्षेला जाताना काळाचा घाला )

ते म्हणाले, पाकिस्तानने या युद्धांना पाठिंबा देण्यासाठी आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमातही बदल केले, जे आजपर्यंत सुधारलेले नाहीत. ख्वाजा आसिफ म्हणाले की, १९९९ नंतर, पाकिस्तान पुन्हा अमेरिकेचा पाठिंबा मिळविण्यासाठी युद्धात सहभागी झाला, ज्यासाठी आम्हाला मोठी किंमत मोजावी लागली आहे. त्यांनी या निर्णयांसाठी माजी लष्करप्रमुख जनरल झिया-उल-हक व जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, पाकिस्तानचा वापर टिश्यू पेपरसारखा, टॉयलेट पेपरपेक्षाही वाईट व नंतर फेकून देण्यात आला.(Pakistan News)

ख्वाजा आसिफ यांनी असेही म्हटले की, या चुकीच्या निर्णयामुळे पाकिस्तान इतरांच्या युद्धात एक प्यादे म्हणून उभा राहिला. ते म्हणाले, “१९८० च्या दशकात अफगाणिस्तानात रशियाविरुद्ध उठाव झाला होता, जो अमेरिकेने घडवून आणला होता. त्यावेळी तत्कालीन पाकिस्तान सरकारला अमेरिकन कुबड्यांची गरज होती आणि म्हणून आमच्या लोकांना त्यात सहभागी करून घेतले, जे एक मोठी चूक होती, अशी जाहीर कबुली ख्वाजा आसिफ यांनी दिली. तालिबानने रशियाविरुद्ध सुरू केलेल्या युद्धाला जिहाद म्हटले गेले. तथापि, ते जिहादी नव्हते कारण रशियाने अफगाणिस्तानवर कब्जा केला नव्हता. या युद्धात पाकिस्तानच्या सहभागाचे कोणतेही समर्थन नव्हते, परंतु आम्ही तरीही लढलो, असेही ते म्हणाले.(Pakistan News)

अमेरिकेने आमचा वापर टॉयलेट पेपरसारखा केला 

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, “आम्ही अमेरिकेसाठी काय केले नाही?, आम्ही त्यांना युद्ध लढण्यासाठी आमचे हवाई क्षेत्र दिले. आम्ही त्यांना कराची बंदर दिले. आम्ही त्यांना आमचे सैन्य दिले, पण त्या बदल्यात आम्हाला काय मिळाले?, अमेरिकेने आमचा वापर टॉयलेट पेपरसारखा केला. त्यांनी वापरल्यानंतर आम्हाला फेकून दिले.” गेल्या आठवड्यात इस्लामाबादमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचे हे विधान समोर आले आहे. अफगाणिस्तानने हल्लेखोराला प्रशिक्षण दिले आणि पाठवले असा दावा करत पाकिस्तानने या हल्ल्यासाठी अफगाणिस्तान(तालिबान राजवट)ला जबाबदार धरले आहे.

तालिबानमुळे पाकिस्तानचे किती नुकसान झाले?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी २०१८ मध्ये एक विधान केले होते. या विधानात इम्रान खान म्हणाले होते की, तालिबान आणि अल-कायदा समर्थित दहशतवाद्यांशी लढताना पाकिस्तानने ७५ हजार नागरिक गमावले. या युद्धात पाकिस्तानला १२३ अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान झाले. त्यानंतर फक्त २० अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत मिळाली. दरम्यान, सोव्हिएत युनियनविरुद्धच्या युद्धात अधिकृतपणे ३०० पाकिस्तानी मारले गेले. ते सर्वजण मुजाहिदीन म्हणून तालिबानसाठी लढण्यासाठी गेले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.