
प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयाच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने अमरावती जवळील आलियाबाद येथील ११.२९ हेक्टर जमिनीचा अंतिम ताबा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सोपवण्यास महसूल विभागाने मंजुरी दिल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बुधवारी दिली.
या जागेवर १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाईल. या महाविद्यालयाला संलग्न ४३० रुग्णखाटांचे अद्ययावत रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. जमिनीचा ताबा मिळाल्यापासून तीन वर्षांच्या नियोजित प्रकल्पाचे काम सुरू करणे बंधनकारक असल्याचे महसूल विभागाच्या आदेशात म्हटले आहे.(Chandrashekhar Bawankule)
(हेही वाचा – Uttrakhand सरकारचा मोठा निर्णय; मदरशांची संपवली मक्तेदारी )
जमीन ‘भोगवटादार वर्ग-२’ या धारणाधिकाराने मूल्यरहित आणि कब्जेहक्काने प्रदान करण्यात आली आहे. जमिनीच्या वापराबाबत सरकारने काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. महसूल विभागाच्या परवानगीशिवाय या जमिनीची विक्री, देणगी, गहाण किंवा कोणत्याही खाजगी-सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर हस्तांतरण करता येणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.(Chandrashekhar Bawankule)
‘ या निर्णयामुळे अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम विदर्भातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. विद्यार्थ्याना मोठी संधी उपलब्ध होईल.जिल्ह्यातील नागरिकांची रुग्णालयाची मागणी होती. आरोग्यसेवा म्हणजे ईश्वरसेवा, हा सरकारचा ध्यास आहे'(Chandrashekhar Bawankule)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
