Republic Day 2026 : अरबी समुद्रात तिरंगा फडकणार; शेकडो नौका देणार अनोखी मानवंदना

97
तिरंगा फडकवताना नौकांवर उपस्थित मान्यवर
Republic Day 2026 : अरबी समुद्रात तिरंगा फडकणार; शेकडो नौका देणार अनोखी मानवंदना
  • प्रतिनिधी

भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई अरबी समुद्राच्या मध्यभागी आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. समुद्राच्या लाटांवर डोलणाऱ्या अत्याधुनिक पर्यटन नौकेवर आपल्या देशाचा तिरंगा उपस्थित निमंत्रीत मान्यवरांच्या शुभहस्ते फडकाविला जाणार आहे. कार्यक्रमासाठी दिव्यांग, गतिमंद आणि निराधार ज्येष्ठ नागरिकांना विशेष आमंत्रित केले गेले असून प्रजासत्ताक दिनाचा अनोखा कार्यक्रम दाखवून या सर्वांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (Republic Day 2026)

(हेही वाचा – US Gaza Peace Plan मध्ये सहभागी झाल्यास भारताला काय फायदे होणार आणि काय तोटे?)

‘यॉट ओनर्स वेलफेअर असोसिएशन’ (YOWA) यांच्या संकल्पनेतून यावेळी अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ जानेवारी रोजी सकाळी ९.१५ ते ११ वाजेपर्यंत मुंबईचे ऐतिहासिक प्रवेशद्वार असलेल्या ‘गेटवे ऑफ इंडिया’ जवळील समुद्रात आयोजित या कार्यक्रमात २०० हून अधिक शिडाच्या नौका, स्पीडबोट आणि अत्याधुनिक पर्यटन नौका (यॉट्स) सहभागी केल्या जाणार आहेत. देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करताना या नौका तिरंगा रंगात विभागल्या जाऊन एक रांगेत डौलत नौका संचलन (परेड) करतील. (Republic Day 2026)

(हेही वाचा – India-EU Trade Deal : मुक्त व्यापार करारासंदर्भात लवकरच मोठी घोषणा, प्रजासत्ताक दिनानंतर दिल्लीत शिखर परिषद)

राष्ट्रगीत झाल्यावर एकाच वेळी सर्व बोटींचे हॉर्न १० सेकंद वाजवून राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देखील देण्यात येणार आहे. दरम्यान या कार्यक्रमाबाबत बोलताना “हे केवळ नौकांचे प्रदर्शन नसून, भारतीय प्रजासत्ताकाच्या विविधतेला आणि सामर्थ्याला अर्पण केलेली ही अनोखी मानवंदना आहे,” असे सांगत ‘यॉट ओनर्स वेलफेअर असोसिएशन’ अध्यक्ष सागर जोंधळे यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे येऊन आपल्या तिरंग्याला दिली जाणारी ही अनोखी मानवंदना पाहण्याचा अनुभव देशप्रेमी जनतेने घ्यावा, असे आवाहन केले आहे. (Republic Day 2026)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.