मुंबईची (Mumbai Local) जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल ट्रेन आता प्रवाशांच्या जिवावर उठली आहे. मध्य रेल्वेच्या नाहूर स्थानकाजवळ रविवारी दुपारी एका ३५ वर्षीय तरुणाचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाला. मनीष बाळू लोखंडे असे या मृत प्रवाशाचे नाव असून, ते रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करत होते. रविवारी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे गाड्यांच्या वेळापत्रकाचा बोजवारा उडाला होता, परिणामी झालेल्या प्रचंड गर्दीमुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. (Mumbai Local)
हेही वाचा-Sri Lankan Navy: श्रीलंकेच्या नौदलाची कारवाई! १० मच्छिमारांना अटक, बोटही जप्त
मिळालेल्या माहितीनुसार, मनीष लोखंडे हे मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये टेक्निशियन पदावर कार्यरत होते. दरम्यान, मनीष लोखंडे यांनी रविवारी कुर्ला स्थानकावरून बदलापूरकडे जाणारी लोकल पकडली होती. ब्लॉकमुळे गाड्या उशिराने धावत असल्याने लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. परिणामी, त्यांना दरवाजात लटकून प्रवास करावा लागला. दुपारी १:५० च्या सुमारास लोकल नाहूर स्थानकाजवळ पोहोचली असता, मनीष यांचा तोल गेला आणि तो धावत्या लोकलमधून खाली पडला. (Mumbai Local)
लोकलमधून पडल्याने मनीष यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. रेल्वे पोलीस आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली आहे. (Mumbai Local)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community

