अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार Sanjay Khodke अपघातात गंभीर जखमी

अमरावतीमध्ये विधानपरिषदेचे आमदार संजय खोडके (Sanjay Khodke) हे अपघातामध्ये गंभीर जखमी झाले. महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने अमरावती शहरात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

110
अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमादार आमदार संजय खोडके (Sanjay Khodke) यांच्या दुचाकीला कारची धडक बसल्याने भीषण अपघात झाला, त्यात आमदार गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या आमदार संजय खोडके यांना उपचरासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीमध्ये विधानपरिषदेचे आमदार संजय खोडके (Sanjay Khodke) हे अपघातामध्ये गंभीर जखमी झाले. महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने अमरावती शहरात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार खोडके (Sanjay Khodke) दुचाकीवरून जात होते. याचवेळी त्यांच्या दुचाकीला कारने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की आमदार खोडके (Sanjay Khodke) दूरवर फेकले गेले आणि ते रस्त्यावर पडले. हा अपघाताचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून या व्हिडीओतून अपघाताची भीषणता दिसून येत आहे. अपघातामध्ये आमदार खोडके (Sanjay Khodke) यांच्या पायाला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ उपचारासाठी अमरावतीच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.