Indian Army : जगातील शांतता काळ संपलाय; भारतीय सैन्याचे काय?; काय म्हणाले लष्करप्रमुख द्विवेदी?

सध्या जगात ५० हून अधिक ठिकाणी सक्रिय संघर्ष सुरू आहेत, ज्यामुळे परिस्थिती अत्यंत अस्थिर होत आहे. भारताच्या शेजारील देशांमध्ये अस्थिरता आहे. आपला शत्रू जरी पाकिस्तान असला तरी भारताचे चीनशी संबंध कधीच मैत्रीपूर्ण राहिले नाहीत, असे जनरल द्विवेदी म्हणाले.

181
Indian Army Chief General Upendra Dwivedi speaking at a conference.
General Dwivedi discusses the future of the Indian Army.
जगभरात ‘दीर्घकाळापासून चालत आलेला शांतता काळ आता संपत आहे आणि जग एका अनिश्चित आणि विखुरलेल्या व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे, असे महत्त्वाचे विधान भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ‘चाणक्य डिफेन्स डायलॉग’ मध्ये बोलताना केले. जनरल द्विवेदी यांचे हे विधान जगाच्या सध्याच्या परिस्थितीवर गंभीर विधान मानले जात आहे. यासाठी भारतीय सैन्यही (Indian Army)  कसे तयार आहे त्यासाठी भारतीय सैन्याचा भविष्यातील रोडमॅप काय आहे यावरही त्यांनी भाष्य केला.
सध्या जगात ५० हून अधिक ठिकाणी सक्रिय संघर्ष सुरू आहेत, ज्यामुळे परिस्थिती अत्यंत अस्थिर होत आहे. भारताच्या शेजारील देशांमध्ये अस्थिरता आहे. आपला शत्रू जरी पाकिस्तान असला तरी भारताचे चीनशी संबंध कधीच मैत्रीपूर्ण राहिले नाहीत. ऑपरेशन सिंदूरनंतर हा तणाव शिगेला पोहोचला आहे. दुसरीकडे, चीन आहे ज्याच्याशी लडाखमध्ये अनेक चर्चेच्या फेऱ्यांनंतरही वातावरण तणावाचे आहे, अरुणाचल प्रदेशात राजनैतिक तणाव पुन्हा निर्माण झाला आहे. नेपाळमधील अंतर्गत परिस्थिती बऱ्याच काळापासून अस्थिर आहे. बांगलादेश आणि म्यानमारमध्येही अशीच परिस्थिती आहे. म्हणूनच भारतीय सैन्याला (Indian Army) निर्णायक आणि नेहमीच तयार ठेवावे लागणार आहे. त्यासाठी लष्कराचा परिवर्तनाचा आराखडा अर्थात लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी तीन-टप्प्यांचा रोडमॅप तयार आहे, असेही जनरल द्विवेदी म्हणाले.
  • पहिला टप्पा २०३२ – जलद परिवर्तनाचे दशक.
  • दुसरा टप्पा  २०३७ – आतापर्यंत केलेल्या कामगिरीचे एकत्रीकरण.
  • तिसरा टप्पा २०४७ – तिन्ही दल आणि सैन्याच्या (Indian Army) उपशाखा यांचे एकत्रीकरण केले जाईल आणि भविष्यातीळ आव्हानांसाठी सैन्य (Indian Army) पूर्णपणे तयार असेल.
यासाठी भारतीय सैन्य पुढील चार धोरणांनुसार भविष्यात मार्गक्रमण करणार आहे.
  • स्वावलंबन आणि स्वदेशीकरण – संरक्षण उत्पादन, अंतराळ तंत्रज्ञान आणि सैन्यात (Indian Army) स्वदेशी उपकरणांचा वापर वाढलेला आहे, परंतु त्यात आणखी वृद्धी केली जाणार आहे.
  • नवीन उपक्रम वाढवणे – एआय, सायबर, क्वांटम, स्वायत्त प्रणाली आणि प्रगत साहित्य यासारख्या क्षेत्रांमध्ये आता प्रायोगिक टप्प्याच्या पलीकडे जाऊन मोठ्या प्रमाणात परिणामकारक नवीन उपक्रम राबवणार आहे.
  • अनुकूलन आणि परिसंस्था सुधारणा – राष्ट्रीय आत्मनिर्भर धोरणामध्ये संरक्षण व्यवस्थेलाही पूर्णपणे सामावून घेतले जाईल. यामध्ये सहभागी तज्ज्ञांकडून ठोस सूचना मागवण्यात आल्या आहेत.
  • लष्करी-नागरी संमिश्रण – शैक्षणिक संस्था, उद्योग आणि लष्कर (Indian Army) यांच्यात सखोल समन्वय ठेवला जाणार आहे. भारत आता संशोधन आणि चाचण्या करण्यावर जोर देईल. नवीन उद्योगांना निधी देत ​​आहे आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान मोहिमांमध्ये सहभागी होणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.