विदर्भवासीयांसाठी भारतीय रेल्वेची मोठी घोषणा; नागपूरमार्गे दररोज धावणार Amrut Bharat Express

विदर्भवासीयांसाठी भारतीय रेल्वेची मोठी घोषणा; नागपूरमार्गे दररोज धावणार Amrut Bharat Express

195
विदर्भवासीयांसाठी भारतीय रेल्वेची मोठी घोषणा; नागपूरमार्गे दररोज धावणार Amrut Bharat Express
विदर्भवासीयांसाठी भारतीय रेल्वेची मोठी घोषणा; नागपूरमार्गे दररोज धावणार Amrut Bharat Express

भारतीय रेल्वेने (Amrut Bharat Express) विदर्भवासियांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे. नागपूर मार्गे धावणारी उधना- ब्रम्हपूर- उधना अमृत एक्सप्रेस आता लवकरच दररोज धावणार आहे. या रेल्वेच्या फेऱ्या आठवड्यातून तीन वेळा चालवल्या जात होत्या, परंतु प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आणि विदर्भाला देशभरातून जोडणी मजबूत करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (Amrut Bharat Express)

हेही वाचा-Earthquake : इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर 6.4 तीव्रतेचा भूकंप; कुठलीही वित्त व जीवितहानी नाही

सध्या 19091 उधना–ब्रह्मणपूर अमृत भारत एक्सप्रेस (Amrut Bharat Express) रविवारी, बुधवारी आणि शुक्रवारी धावत आहे. तर 19092 ब्रह्मणपूर–उधना अमृत भारत एक्सप्रेस सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी प्रवास करीत होती. आठवड्यातील केवळ तीन दिवसांच्या या मर्यादेमुळे अनेक प्रवाशांना तिकीट मिळवण्यासाठी अडचणी होत होती. विशेषतः नागपूर, भुसावळ, अकोला, अमरावती आणि वर्धा या मार्गावरील प्रवाशांकडून या गाडीला मोठा प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे प्रतीक्षा यादीत मोठी वाढ झालेली दिसत होती. (Amrut Bharat Express)

हेही वाचा- “आमच्याकडे कोणतीही जादूची कांडी नाही”; दिल्ली प्रदूषणावर Supreme Court ची स्पष्ट टिप्पणी

रेल्वे विभागाने या वाढत्या मागणीचा गंभीरपणे विचार करून अमृत भारत एक्सप्रेस दररोज सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाढत्या गर्दीचा ताण कमी होईल, तिकीट मिळवणे सुलभ होईल आणि प्रवास अधिक सुविधाजनक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Amrut Bharat Express)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.