IPL Trade : नवीन हंगामातील आयपीएलचा पहिला अधिकृत व्यवहार, शार्दूल ठाकूर मुंबईकडे

IPL Trade : नवीन हंगामातील आयपीएलचा पहिला अधिकृत व्यवहार, शार्दूल ठाकूर मुंबईकडे

117
IPL Trade : नवीन हंगामातील आयपीएलचा पहिला अधिकृत व्यवहार, शार्दूल ठाकूर मुंबईकडे
IPL Trade : नवीन हंगामातील आयपीएलचा पहिला अधिकृत व्यवहार, शार्दूल ठाकूर मुंबईकडे
  • ऋजुता लुकतुके

भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर आयपीएलचा(IPL Trade)पुढील हंगाम मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंटस सोबत करार करत शार्दूल ठाकूरला संघात घेतलं आहे. आता शार्दूल ठाकूर रोहित  शर्माच्या साथीने मुंबई इंडियन्सच्या निळ्या जर्सीत खेळताना दिसेल. शार्दूल ठाकूरवर गेल्यावर्षीच्या मेगा लिलावात बोली लागली नव्हती. मात्र त्यानंतर लखनौ सुपर जायंटसने मोहसीन खान जखमी झाल्याने त्याच्या जागी संघात घेतलं होतं.(IPL Trade)

आता मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंटसबरोबर वाटाघाटी करून त्याला आपल्याकडे घेतलं आहे. त्यासाठी मुंबई इंडियन्सने शार्दूल ठाकूरसाठी २ कोटी रुपये मोजले आहेत. शार्दूल ठाकूरला गेल्या वर्षी लखनौने २ कोटी रुपयांमध्ये संघात सहभागी करुन घेतलं होतं. तितकीच रक्कम यावर्षी मुंबई इंडियन्सकडून त्याला दिली जाणार आहे.(IPL Trade)

लखनौ सुपर जायंटसला संघात परदेशी तेज गोलंदाज हवा आहे. आणि मुंबईकडून मिळालेले पैसे ते अशा खेळाडूवर लावतील.(IPL Trade)

(हेही वाचा – Mumbai Crime : पाचशे रुपयांसाठी जीवाशी खेळ,विद्युत उपकेंद्रातून वीज चोरीसाठी लहान मुलांचा वापर)

शार्दूल ठाकूरने आयपीएलमध्ये २०१५ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो २०१७ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंटस या संघात दाखल झाला. २०१८ ते २०२१ मध्ये शार्दूल ठाकूर चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला. दिल्ली कॅपिटल्सकडून शार्दूलने २०२२ च्या हंगामात सहभाग घेतला. तर, २०२३ मध्ये शार्दूल ठाकूरला १०.७५ कोटी रुपयांमध्ये  कोलकाता नाईट रायडर्सने संघात घेतलं होतं. शार्दूल ठाकूर २०२४ मध्ये पुन्हा चेन्नईच्या संघात दाखल झाला. त्यानंतर शार्दूल ठाकूर २०२५ मध्ये लखनौकडून खेळला आता तो पहिल्यांदा मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. शार्दूल ठाकूरने आयपीएलमध्ये १०५ सामन्यांमध्ये १०७ बळी मिळवले आहेत.(IPL Trade)

भारताचा माजी फिरकीपटू आर. अश्विन याने एक दिवस अगोदर  त्याच्या यूट्यूब चॅनेलवरुन शार्दूल ठाकूर मुबंई इंडियन्सच्या संघात दाखल असा दावा केला होता. मात्र, नंतर त्यानं व्हिडिओ डीलीट केला.  विशेष म्हणजेच  मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर आर. अश्विनच्या व्हिडीओची लिंक पोस्ट केली, ज्यात त्याने शार्दूल ठाकूर मुंबईच्या संघात जाणार असल्याची घोषणा केली होती.(IPL Trade)

मुंबई इंडियन्स फ्रँचाईजी आगामी हंगामासाठी अर्जुन तेंडुलकरला मुक्त करू शकते. किंवा लखनौसोबत त्याच्या बाबतीतही देवाण घेवाण होऊ शकते. अर्जुन तेंडूलकरची फी सध्या ३० लाख रुपये आहे.(IPL Trade)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.