Rohit Sharma : ३८ वर्षीय रोहित शर्मा आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल

Rohit Sharma : ३८ वर्षीय रोहित शर्मा आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल

155
Rohit Sharma retirement
फॅन्सची वाढली चिंता; वन-डे मधून Rohit Sharma च्या निवृत्तीची चर्चा

ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका आपल्या भक्कम फलंदाजीने गाजवलेल्या रोहित शर्माने (Rohit Sharma) ३८ व्या वर्षी आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावण्याचा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्घच्या तीन एकदिवसीय सामन्यांत त्याने ३०६ धावा केल्या. आणि या प्रयत्नांत नवीन कर्णधार शुभमन गिलला मागे टाकून त्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. ३८ वर्ष आणि १२८ दिवसांच्या रोहितने (Rohit Sharma) पहिल्यांदाच अव्वल क्रमांक पटकावला आहे. आणि अव्वल फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. (Rohit Sharma)

आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पहिला आलेला तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोणी, विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या पाठोपाठ ही कामगिरी रोहितने (Rohit Sharma) केली आहे. गेल्या आठवड्यात रोहीतचे रेटिंग गुण ७४५ होते. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यात तो ८ धावांवर बाद झाला असला तरी दुसऱ्या सामन्यांत त्याने ९७ चेंडूंत ७३ धावा केल्या. आणि शेवटच्या सिडनीतील सामन्यांत तर नाबाद १२१ धावा केल्या. (Rohit Sharma)

रोहितने या क्रमवारीत भारताच्याच गिलला मागे टाकलं आहे. गिल मालिकेतील खराब कामगिरीनंतर थेट तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. गिलने या मालिकेत अनुक्रमे १०, ९ आणि २४ धावा केल्या. तर या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांत शून्य आणि शेवटच्या सामन्यात नाबाद ७४ धावा करणारा विराट कोहली पाचव्या स्थानावर कायम आहे. (Rohit Sharma)

विराट कोहलीकडे या आठवड्याच्या सुरुवातीला ७२४ रेटिंग गुण होते. ते आता ७३० वर पोहोचले आहेत. (Rohit Sharma)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.