सध्या पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावर प्रवाशांचा मोठा ताण आहे. एकट्या विरारहून दररोज 5.8 लाख प्रवासी प्रवास करतात, तर डहाणूवरून 2.6 लाख नागरिक मुंबईकडे प्रवास करतात. वैतरणा आणि बोईसरसारख्या छोट्या स्थानकांतूनही हजारो प्रवासी दररोज मुंबईत प्रवास करत असल्याने लोकलमध्ये (Western Railway) प्रचंड गर्दी होते. दररोज हजारो नागरिक पालघरहून नोकरी आणि कामासाठी मुंबईत येतात. यामुळे पालघर ते चर्चगेट रेल्वे मार्गावर प्रचंड गर्दी होते. यामुळे मुंबईकरांचे अनेकदा हाल होतात. या त्रासातून मुंबईकरांना मुक्त करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर एक मेगा प्रोजेक्टवर काम सुरू आहे. या अंतर्गत पश्चिम रेल्वेवर 7 नवीन स्थानके उभारली जाणार आहेत. (Western Railway)
हेही वाचा-Accident News : भरधाव बस थेट दुर्गा मंडपात घुसली; २० जणांना धडक, चालक मद्यधुंद अवस्थेत
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (MRVC) माध्यमातून विरार-डहाणू (Western Railway) चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हा 64 किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे. एकाच प्रकल्पांतर्गत शहराच्या रेल्वे नेटवर्कमध्ये एवढी नवीन स्थानकं जोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. MRVC चा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून यासाठी 3578 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा संपूर्ण रेल्वे मार्ग जून 2027 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. (Western Railway)
सध्या विरार-डहाणू रेल्वे मार्गावर (Western Railway) विरार, वैतरणा, सफाळे, केळवे रोड, पालघर, उमरोली, बोईसर, वाणगाव आणि डहाणू रोड अशी नऊ स्थानके आहेत. या नऊ स्थानकांदरम्यान आता आणखी सात स्थानकांची उभारणी केली जाणार आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या चौपदरीकरणामुळे विरार ते डहाणू आणि चर्चगेट ते डहाणूदरम्यानच्या रेल्वे सेवांमध्ये मोठी वाढ करण्यास मदत होईल. सध्या चर्चगेट ते डहाणूदरम्यान दिवसाला फक्त 6 ते 7 थेट गाड्या धावतात. चौपदरीकरणामुळे विरार-डहाणू दरम्यानच्या लोकल फेऱ्यांसह संपूर्ण मार्गावर 200 पेक्षा अधिक सेवा चालवल्या जाऊ शकतात. यामुळे प्रवाशांना त्यांच्या इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी जास्त पर्याय उपलब्ध होतील आणि लोकलच्या वेळेतील अनियमितताही कमी होईल. (Western Railway)
संभाव्य नवीन स्थानकांची नावं (Western Railway)
वाढिव
सरतोडी
माकुणसार
चिंचपाडा
पंचाळी
वंजारवाडा
BSES कॉलनी
हेही पहा-
Join Our WhatsApp Community

