
-
ऋजुता लुकतुके
रविवारी आशिया चषकावर नाव कोरल्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतला आहे आणि मायदेशात खेळाडूंचं जंगी स्वागत होत आहे. विंडिज बरोबरची कसोटी मालिका २ ऑक्टोबरपासून सुरू होत असल्यामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, कुलदीप यादव, शुभमन गिल आणि आणखी काही खेळाडू थेट अहमदाबादमध्ये पोहोचले. त्यांनी नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सरावही सुरू केला आहे. पण, त्यापूर्वी विमानतळावर भारतीय खेळाडूंचं जोरदार स्वागत झालं. (Asia Cup)
टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवही मुंबईत परतला. लोकांनी अक्षरश: रस्त्यावर उतरून त्याचं स्वागत केलं. लोकांनी भारतीय तिंरगा फडकावला, खेळाडूंच्या नावाच्या घोषणा दिल्या आणि सूर्यकुमारच्या गाडीचा कौतुकाने पाठलागही केला. विमानतळाच्या बाहेरच लोकांनी दुतर्फा गर्दी केली होती. (Asia Cup)
(हेही वाचा – Asia Cup Drama : आशियाई परिषदेच्या बैठकीत भारताची पाकविरुद्ध तक्रार; लवकरात लवकर आशिया चषक देण्याची मागणी)
The grand welcome of Captain suryakumar Yadav in his building Mumbai.❤️🇮🇳 pic.twitter.com/4d7euroOtM
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) September 30, 2025
भारतीय संघाने आशिया चषकात दमदार कामगिरी करताना साखळी सामने आणि सुपर फोरमध्ये सलग सात विजय मिळवले आणि अंतिम फेरीतही पाकिस्तानवर दिमाखदार मात केली. एकूण तीन वेळा पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने सामने आले आणि यातील प्रत्येक सामना भारताने निर्विवादपणे जिंकला. भारतासाठी आता पुढील मोहीम ही वेस्ट इंडिजविरुद्ध आहे. २ ऑक्टोबरपासून विंडिज विरुद्धची पहिली कसोटी अहमदाबादला सुरू होत आहे. (Asia Cup)
आणि यासाठी कसोटी संघातील खेळाडू दुबईतून थेट अहमदाबादला दाखल झाले आहेत. बाकी खेळाडू आपापल्या गावी परतले आहेत. कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ पुन्हा एकदा सफेद चेंडूने खेळताना दिसेल. ऑक्टोबरच्या शेवटी भारतीय संघ एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. (Asia Cup)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
