Asia Cup 2025 : आशिया चषकात हस्तांदोलन नाट्यानंतर भारतीय संघ सुपर फोरमध्ये, पाकिस्तान अधांतरी 

Asia Cup 2025 : पाकला युएईविरुद्घ जिंकावंच लागणार आहे 

238
Asia Cup Drama : भारतीय संघाने यावेळी सामन्यानंतर हस्तांदोलन केलं! पण...
  • ऋजुता लुकतुके

सध्या आशिया चषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर हस्तांदोलन नाट्य गाजतंय. भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत पाक खेळाडूंशी हस्तांदोलन करायला नकार दिला होता. इतकंच नाही तर सामन्यानंतर ड्रेसिंग रुमचे दरवाजेही बंद केले. त्यामुळे चिडून पाक क्रिकेट मंडळाने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. आणि त्यांच्या उचलबांगडीची मागणी केली आहे. जर पायक्रॉफ्ट यांच्यावर कारवाई झाली नाही तर आशिया चषकातून माघार घेण्याची धमकीही त्यांनी दिली आहे. भारतावरही त्यांनी अखिलाडू वृत्तीचा आरोप केला आहे.(Asia Cup 2025)

(हेही वाचा – Deonar Slaughterhouse होतंय आधुनिक; रस्ते आणि गल्लीबोळातील अनधिकृत कत्तलींना लागणार चाप)

पाक मंडळाची मागणी आयसीसी ऐकेल अशी परिस्थिती नाहीए. त्यामुळे हस्तांदोलन नाट्य आणखी काय वळण घेतं याकडे आता पाहावं लागेल. एकीकडे, मैदानाबाहेर ही परिस्थिती आहे तर दुसरीकडे, मैदानावरही पाकिस्तानच्या संघावर बाहेर पडण्याची लटकती तलवार आहे. भारताने सलग दुसऱ्या विजयानंतर सुपर फोरमधील आपला प्रवेश नक्की केला आहे. तर दुसरीकडे, संयुक्त अरब अमरातीने भारताविरुद्धच्या पराभवानंतर ओमानवर विजय मिळवला आहे.(Asia Cup 2025)

या विजयानंतर आता सुपर फोरची गणितं काहीशी स्पष्ट झाली आहेत. ए गटात दोन विजयांसह भारतीय संघ अव्वल आहे. आणि दोन पराभवांनंतर ओमानचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमरातीने प्रत्येकी एक विजय मिळवला आहे. आणि सुपर फोरचा फैसला त्याच्यातील साखळी सामन्याने होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ सुपर फोरमध्ये जाईल. या सामन्यात पराभव झाला तर पाकिस्तानला घरचं विमान पकडावं लागेल.

(हेही वाचा – ITR Filing Extension : आयकर विवरणपत्र भरण्यासाठी एका दिवसाची वाढीव मुदत )

त्यांनी सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याविरुद्ध आयसीसीकडे दाद मागितली आहे. आणि जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर स्पर्धेवर बहिष्कार घालण्याची भाषा केली आहे. आता जर आयसीसीने पाकिस्तानचं म्हणणं ऐकलं नाही आणि ते स्पर्धेतून बाहेर पडले तर त्यांच्या ऐवजी संयुक्त अरब अमिराती सुपर फोरमध्ये पोहोचतील.(Asia Cup 2025)

हेही पहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.