
मराठा आरक्षणाच्या निर्णायक टप्प्यावर आझाद मैदान(Azad Maidan) पेटून उठले आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी अभ्यासकाला थेट इशारा देत आक्रमक भूमिका घेतली. “अभ्यासक यावेळी चुकला तर त्याचे गंभीर परिणाम होतील, हे लक्षात ठेवा,” असे ठामपणे सांगत त्यांनी चर्चेतला सूर अधिकच तापवला. मनोज जरांगे यांनी आपल्या समवेत अभ्यासाक देखील आणले आहेत. (Maratha Reservation)
राज्य सरकारच्या(State Govt) शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेत जरांगेंनी स्पष्ट अल्टिमेटम दिला – “आधी सगळे होकार देतात आणि नंतर पाठी फिरतात. हा खेळ आता चालणार नाही. एका तासाच्या आत जीआर(GR) काढा, नाहीतर सरकारलाच त्याचे परिणाम भोगावे लागतील.” (Maratha Reservation)
(हेही वाचा – Maratha Reservation : “मुंबई रिकामी करण्याचा शब्द… पण एका अटीवर!”)
दरम्यान, सरकारने काही महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा गॅझेटियरची अंमलबजावणी करण्यास तातडीने तयारी दर्शवण्यात आली आहे. यासोबतच आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन आणि हुतात्मा कुटुंबांना मदत देण्याचा निर्णयही चर्चेतून पुढे आला आहे. मात्र, तरीसुद्धा जरांगेंचा अविश्वास कायम आहे. (Maratha Reservation)
जरांगेंनी वाशीतील घटनेचा संदर्भ देत सरकारला इशारा दिला
“वाशीला दिलेला धक्का आम्ही अजून विसरलेलो नाही. एकदा दिलेला शब्द सरकारने मोडला. पुन्हा तोच खेळ झाला, तर मराठा समाज शांत बसणार नाही.”
आता राज्य सरकार(State Govt) पुढील पाऊल कोणते टाकते आणि जरांगेंची भूमिका कोणत्या नव्या वळणावर जाते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (Maratha Reservation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
