स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day 2025) पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी देशवाशियांना संबोधित केले. यावेळी ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) आणि भारत सरकारच्या कामांचे कौतुक केलं. १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य पर्व नाहीये तर प्रत्येक भारतीयासाठी गर्वाचे प्रतिक आहे. संविधान आणि लोकशाही हे आमल्यासाठी सर्वोच्च आहे. या दोन्ही गोष्टी आमल्या ताकद आहेत, असे विधान राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी केले.(President Droupadi Murmu)
स्वातंत्र्यानंतर देशातील प्रौढ लोकांना मताधिकार मिळाला आणि भारत लोकशाहीच्या मार्गावर चालू लागला. या मार्गात अनेक आव्हाने आली तरीही त्यात देशाने यश मिळवलं. राष्ट्रपती यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यातील वीरांना नमन करत त्यांच्या बलिदानामुळे आपल्याला ७८ वर्षाआधी स्वातंत्र्य मिळाल्याचं म्हणाल्या. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी अलिकडच्या ऑपरेशन सिंदूरचाही उल्लेख केला. दहशतवादाविरुद्ध मानवतेच्या लढाईचे उदाहरण म्हणून इतिहासात ऑपरेशन सिंदूरची नोंद केली जाईल. ऑपरेशन सिंदूर हे पहलगाम हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर होते. या ऑपरेशनमुळे भारतीय लष्कर (Indian Army) देशाचं संरक्षण करण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं.
पहलगाम हल्ल्यात निर्दोष व्यक्तींची हत्या
या वर्षात आपल्याला दहशतवादाचा सामना करावा लागला. काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या निर्दौष नागरिकांची हत्या करण्यात आली हे अमानवीय होती. या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूरमुळे आपले सैन्य कोणत्याही परिस्थीत दहशतवाद्यांचा सामना करण्यास तयार असल्याचं दाखवून दिलं. लष्कराने तंत्रज्ञानाच्या क्षमतेसह सीमेपार दहशतवाद्यांच्या स्थळांना नष्ट केलं. भारताकडून देण्यात आलेल्या उत्तरात भारताची एकता दिसून आली. जे भारताला विभाजित करण्याचा प्रयत्न करत होते त्यांना भारतीय लोकांनी एकतेतून उत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) हे आत्मनिर्भर भारत मोहिमेसाठी महत्त्वाचं ठरले. आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या माध्यमातून संरक्षणासाठी शस्त्र तयार करण्यात आली.
(हेही वाचा – …जेव्हा Raj Thackeray आपल्याच कार्यकर्त्याची फिरकी घेतात; बघा काय म्हणाले, व्हिडीओ होतोय व्हायरल)
स्वदेशी उत्पादनात महत्त्वपूर्ण स्तर प्राप्त केलाय. संरक्षणासाठी लागणारे शस्त्र निर्माण करण्यात भारत आत्मनिर्भर (Atmanirbhar Bharat) झाल्याचं या ऑपरेशनमधून दिसून आलं. १५ ऑगस्ट ही तारीख देशाच्या सामूहिक स्मृतीत कोरलेली ऐतिहासिक तारीख आहे. प्रदीर्घ वसाहतवादी राजवटीत भारतीयांनी पिढ्यानपिढ्या या दिवसाचे स्वप्न पाहिले होते. त्यांचा संघर्ष आणि जिद्द, आशावादाने भरलेला होता, असे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

